05 November, 2017

04 November, 2017

वर्षा तुझे नाव (कविता)

'वर्षा तुझे नाव' हि कविता एकण्याकरिता खालील व्हिडीयोवर क्लिक करा.
वरील व्हिडियो सुरु होत नसल्यास येथे क्लिक करा:- Video

14 June, 2017

पहिला पाऊसपहिला पाऊस खूप काही देऊन जातो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या जीवांना सुखावून जातो. उन्हाने करपलेल्या, भेगा पडलेल्या ओसाड धरतीला भिजवून जातो. पहिल्या पावसात मातीचा येणारा सुगंध तर काही अप्रतिमच असतो. कडक उन्हाने जीवाची जी काही लाही लाही झाली असते ती पहिल्या पावसाने अगदी घामासकट धुवून निघते. ते टपोरे पाण्याचे थेंब भलेही टोचणारे असतील पण ते आता हवे हवेसे वाटतात. ओले झालेले कपडेसुधा आनंदाने बदलावेसे वाटतात. डोक पुसत मग वाफाळलेला चहा घेत खिडकीत बसुन नुसतंच त्याला पाहत बसावसं वाटतं. आणी मग मनात विचारांच जे काहुर माजतं ते असं......

आभाळ गडगडलं, विजा चमकल्या 
ढगांनी वेढलं तळपत्या सूर्याला.
थेंबामागून थेंब जमिनीवर पडला 
काळ्या मातीतुन सुगंध दरवळला.

आल्या सरी रीप-झिप करीत 
भणंग धरतीला ओल्या करीत.
आधी टपोरे थेंब, मग टपोऱ्या गारा 
न्हाऊन निघाला हा परिसर सारा.

सुखावली मनं, शांत झाली धरती 
उपकार त्याचे जो वरूण आहे वरती.
थोडा अजुन बरस, मज शांत भिजू दे 
घामाच्या धारासाहित निराशा पुसू दे.

चिंब हि धरती अन गार हा वारा 
तुझ्या कवेत आज, हा विश्व सारा.
उधळू दे रंग मज तू माझ्या मनाचे
विश्वाच्या रंगात इंद्रधनुष्य प्रेमाचे.

टाक इवलासा कटाक्ष या धरतीकडे 
बघ किती आनंदले इवलेसे गाव माझे. 
सुखावले गावकरी तुझ्या आगमनाने 
पुजतील तुला जन्मभर अभिमानाने.

असाच बरसात रहा चोहीकडे 
पुन्हा दुष्काळ आम्हा देऊ नकोस. 
गावकऱ्याच्या च्या भावनांशी
असा लपून- छपून खेळू नकोस. 

आजचा दिवस तुझ्या संगतीत गेला.
तुझ्या वाचुन फक्तच उन्हाळा नी हिवाळा.
असेच उपकार कर या धर्तीवर 
आमचाही असंच तुझ्यावर जिव्हाळा.

- अनिकेत भांदककर 

04 June, 2017

वाटण्यातला आनंद (हृदयस्पर्शी कथा)

कालच मित्राला त्याच्या जीवनातील पहिला पगार मिळाला, म्हणाला, "कपडे घायला जाऊया". खूप दिवसापासून दोन जोडी कपड्यावर काम भागवित होता तो. ब्रँडेड कपडे घ्यायचे होते त्याला. कपड्याच्या शोरूम मध्ये ब्रँडेड कपडे बघतांनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. थोड्या वेळाने म्हणाला, "चल दुसरीकडे बघुया".

काय झाले काहीच कळले नाही. मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. साध्या दुकानात. आता तो लोकल कपडे बघू लागला. विचारले काय झाले तर काहीच बोलला नाही. तिथून कपडे घेऊन आम्ही बाहेर पडलो. म्हणाला, "जवळपास दोन हजार वाचलेत".

मला आश्चर्यच वाटलं, कालच पगार झाला, पगारही चांगला, पहिल्या पगारात ब्रँडेड कपडे घेईल म्हणून हा इतके दिवस जीव लावून बसला होता, आणि आता काय झालं अचानक असं.?

05 March, 2017

प्रेमपत्राची होडी करून वाहत होतामेहंदीने रंगलेला तिचा हात लाल होता पण 
तो त्याच्यासाठी नव्हता म्हणुन त्याचा जीव जात होता.

जरी ओठांवर हसू लोळत असले तरी 
मनातून तो उदास गाणे गात होता.

आता लग्नही जुळाले होते तिचे दुसरीकडे
तरी आशेखातर तो मामाकडे जात होता.

तिला नाही म्हणणे त्याला कधी जमलेच नाही
नसतांनाही भूक तो घासावर घास खात होता.

स्वतःच्या प्रेमालाच तो स्वतःच्या डोळ्यांनी 
अलगद परकं होतांना पाहात होता.

तिच्या आठवणीच्याच सागरात मग तो 
प्रेमपत्राची होडी करून वाहत होता.

- अनिकेत भांदककर.

28 February, 2017

माझ्यासाठी परत एकदा जगुन तर बघ...


 


माझ्यासाठी परत एकदा जगुन तर बघ...हि कविता ऐकण्याकरिता वरील विडीयोवर क्लिक करा.

कवितेचा विडीयो येथून डाउनलोड करा- Download

27 August, 2016

शब्दझेप- हृदयस्पर्शी मराठी चारोळ्या विडीयो.

शब्दझेप ह्या चारोळीसंग्रहात प्रसिद्ध झालेल्या तसेच ह्या ब्लोगवर पूर्वी टाकलेल्या चारोळ्यांचा हा विडीयो आहे. आपण चारोळ्या नेहमी वाचत असतो पण त्या ऐकण्याची मज्या काही औरच असते. एकदा एकूण बघा आणी कसं वाटलं ते नक्की सांगा.खाली यु ट्यूब विडीयो दिला आहे. चारोळ्या पाहण्याकरिता त्यावर क्लिक करा.

विडीयो पाहण्याकरिता विडीयोवरील प्ले चिन्हावर टिचकी मारा. किवा खालील लिंकवर क्लिक करा.