01 October, 2019

अनकंट्रोल्ड - भाग 5



चौथा भाग - येथे वाचा.

मिटिंग आटोपली तेव्हा सायंकाळ झाली होती. ऍड. घोष घराकडे निघाले. विराटने ओजस्वीला कॉफीची ऑफर दिली. दोघेही कॉफी प्यायला एक रेस्तराँमध्ये गेले. अंधार पडायला लागला होता. मंद हवा सुरु होती. प्रेझेन्टेशन चांगलं झालं होतं म्हणून दोघही खुश होते. कॉफीचे झुरके घेत दोघही एकमेकांशी बोलत होते. मस्त रोमँटिक वातावरण तयार झालं होतं. त्यांनी कॉफी संपविली आणि ओजस्वीला घरी सोडून देण्यासाठी दोघेही तिच्या घराकडे निघाले. तिच्या घरासमोर गाडी आली. तिचं घर म्हणजे मोठा आलिशान बंगला.

ओजस्वीने त्याला आत यायची विनंती करत म्हणाली "अरे तुझी हि पहिली वेळ आहे, प्लिज आत तर ये."

विराट म्हणाला "अग नाही, उशीर होतोय, माझी स्वरा वाट बघत असेल."

"अरे थोड्यावेळासाठी ये, आई बाबा हेद्राबादला गेले आहे ते येईल साडे दहा - अकरा पर्यंत, तो पर्यंत मला कंपनी दे" ओजस्वी अगदी प्रेमाने म्हणाली.

"काय? सर नाही आहे? मग तर असं येणं बरोबर वाटणार नाही ग"  विराटने सहजतेने उत्तर दिले.

"अरे काही होत नाही, चल तू, मला भीती वाटते एकटं असलं की" ओजस्वी लाडवत म्हणाली.

"कसलं एकटं, नौकर आहेत की" विराट मस्करीत उत्तरला.

"अरे आपलं कुणीतरी पाहिजे रे" ओजस्वीने थोडी मान झुकवत अगदी नजरेला नजर भिडवत म्हटले. आता विरटही तिला नाही म्हणू शकला नाही. वॉचमन ने गेट उघडले. गाडी आतमध्ये गेली.

एका नौकराने दार उघडले. विराट बंगल्यात शिरला. मोठा हॉल त्यात भलेमोठे झुंबर, मोठ्या पेंटिंग्स, उच्च दर्जाचे फर्निचर, इटालियन मार्बल इ. सगळं सिनेमात दाखवितात तसं. हॉलमधून एक भलामोठा जिना वर जात होता. ओजस्वी त्याला वर आपल्या रूम मध्ये घेऊन गेली. तिची रुम पण आलिशान होती.
तिने कपडे बद्दलविले. घरच्या कपड्यात ती अजून सुंदर दिसत होती. तिलाही विराट आवडू लागला होता. हि खूप चांगली संधी आहे त्याला आपल्या मनातलं सांगण्याची हे ओजस्वीला कळतं होतं पण हे त्याने बोलावं असं तिला वाटत होत. विराटला पण ती आवडायला लागली होती पण आपलं लग्न झालं आहे आणि आपण आपल्या बायकोला असं फसवू शकत नाही या विचाराचा तो होता.

तिच्या रूममध्ये एक सोफा होता त्यावर विराट बसला होता. ओजस्वी त्याचा जवळ येऊन बसली. तसं वातावरण अगदी रोमँटिक झालं होतं. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. शेवटी ओजस्वीने आपल्या मनातली गोष्ट विराटला सांगितली. विराटही बोलला. तो क्षण असा होता की दोघांच्याही मनातले जर - तर चे विचार गळून पडले होते. एकमेकांप्रती असणाऱ्या भावना दोघांनाही आता रोकायच्या नव्हत्या. त्यांना व्यक्त व्हायचं होतं. तो नाजूक क्षण होता आणि त्या नाजूक क्षणी दोघेही आपला 'कंट्रोल' हरवत चालले होते.

विराटने ओजस्वीला अलगद आपल्या जवळ खेचले. ओजस्वीपण आता थांबण्याचा मूड मध्ये नव्हती. त्याच्या मिठीत तिला प्रेमाची उब जाणवत होती आणि वातावरण केव्हा अजून जास्त उबदार झाले हे त्यांना कळले देखील नाही. विराटला अध्ये मध्ये संपदा, स्वराची आठवण येत असे पण आता त्याने देखील आपला कंट्रोल गमावला होता. तो त्या दोघांसाठीपण सर्वोच्च आनंद होता आणि त्या आनंदाच्या शिखरावर असताना विराटचा फोन खणखणला. पण एवढ्या मोक्याच्या क्षणी कोण फोन उचलणार.? फोन पुन्हा वाजला आणि बंद झाला. एक दोन मिनिटातच पुन्हा तिसऱ्यांदा फोन वाजला. आत मात्र दोघेही वैतागले. संपदाचा तर फोन नसेल म्हणून विराटने फोन बघितला.

"वेदिका मॅडम.?" विराटच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

"काही काम असेल त्यांना" ओजस्वी उत्तरली.

"हा बोला मॅडम.."विराट फोन कानाला लावत म्हणाला.

"बिझी होतास का? सॉरी तुला डिस्टर्ब केलं.." मिसेस वेदिकाने रिप्लाय दिला.

"नाही नाही, बोला ना"

मिसेस वेदिका विराटला ERP प्रणालीबद्दल काही विचारू लागल्या. खरंतर मिसेस वेदिकाला विराटशी फक्त बोलायचं होतं म्हणून काहीतरी कारण काढून त्यांनी फोन केला. सुरवातीला पाचएक मिनिटे विराट सर्व समजावून सांगू लागला पण वेदिका अजून अजून प्रश्न विचारत असे आणि नंतर तर विराटपण वैतागला. एवढ्या महत्वाच्या क्षणावर वेदिकाने पाणी फेरले होते. त्याची चिडचिड होऊ लागली पण त्याने कंट्रोल केलं. शेवटी अर्ध्या तासाने वेदीकाने फोन ठेवला. साडे नऊ होऊन गेले होते. दोघांचापण मुड ऑफ झाला होता.

ओजस्वी विराटच्या जवळ आली आणि त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली," हा माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण होता आणि हा क्षण तुझ्यासोबत घडला याचा मला अजून जास्त आनंद आहे."

"माझ्यासाठी ना हा क्षण म्हणजे मुठीत पकडलेली रेती आहे, जेवढा मी जास्त जोरात पडण्याचा प्रयत्न करेन तेवढा हातातून निसटत जाईल" विराटने अगदी रोमँटिकली ओजस्वीचं डोळ्यात पाहत म्हटले.

"ओहो, अकाउंटंट आता रोमँटिक बोलायला लागला वाटते." ओजस्वीने मस्करीत म्हटले.

"संगत का असर, मॅडम" विराट उत्तरला आणि दोघेही खळखळून हसले.

"चल मी निघतो आता, बराच उशीर झाला आहे, घरी स्वरा अन संपदा वाट बघत असेल."

विराट जायला निघाला तोच ओजस्वीने त्याचा हात धरला अन म्हणाली..
"कई राते ऐसी होंगी
कई बातें ऐसी होंगी,
बस तुम साथ देते रेहना
कई मुलाकातें ऐसी होंगी।"
... ...

विराट घाईघाईत घरी पोहोचला. स्वरा झोपली होती. संपदा वाट पाहत बसली होती.

"सॉरी, प्रेझेंटेशनमुळे थोडा उशीर झाला" विराटने घरात शिरतच सांगितले.

"एवढ्यावेळ चाललं का प्रेझेन्टेशन.?" संपादने प्रश्न केला.

"म्हणजे सायंकाळीच संपलं, मग ऑफिसमध्ये थोडी त्यावर चर्चा झाली, रेड्डीसर पण होते त्यामुळे उशीर झाला. तू वाढ, मी फ्रेश होतो, मग जेवू आपण" विराटने घाईतच उत्तर दिले आणि फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला.

रात्री ओजस्वीचा फोन आला तेव्हा विराट बराचवेळ तिच्यासोबत बोलत होता.
... ...

विराट ऑफिसला पोहोचला. रेड्डी सरांना भेटला. कालच्या प्रेझेन्टेशनबद्दल त्यांना सर्व सांगितलं. त्यांना आधीच तशी ओजस्वीने थोडक्यात माहिती दिली होती. रेड्डीसर जाम खुश होते. काहीही करून त्यांना हा प्रोजेक्ट हवा होता.

"त्यांच्या अजून काही शंका कुशंका असेल तर त्या क्लियर करा, हवं तर कोटेशनमध्ये जे रेट्स आपण दिले आहे ते पण कमी करा, पण हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळाला पाहिजे." रेड्डी सरांनी विराटच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले.

"हो सर, तसं आपल्याकडून पुरेपूर प्रयन्त आपण करत आहो, वेदिका मॅडमशी मी वैयक्तिक संपर्कात आहो त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शंकेच निकारण आपल्याकडून होईल यात शंका नाही." विराटने उत्तर दिले.

"म्हणूनच तर हा प्रोजेक्ट मी तुझ्या हातात दिला विराट. मला खात्री आहे तू हा प्रोजेक्ट नक्कीच ओढून आणशील म्हणून" रेड्डी उत्तरले.

विराटची छाती अभिमानाने फुलली होती. आता काही झालं तरी हा प्रोजेक्ट आपण मिळवायचाच असा त्याने चंग बांधला.

दरमान्य तीन चार दिवस गेले. मिसेस वेदिकाचे विराटला रोज कॉल येत असतं. काही शंका विचारण्याच्या बहाण्याने मिसेस वेदिका कॉल करीत असे. त्या त्याच्याशी फ्लर्ट करीत. विराटच्या आता लक्षात आलं होतं पण तो त्या गोष्टी टाळून कामाच्या गोष्टीवर बोलायचा प्रयत्न करीत असे. विराटसारखा मासा एवढ्या सहजा सहजी गळाला लागणार नाही हे वेदिकाला चांगलेच ठाऊक होते. पण मागे हटेल ती वेदिका कसली.
सॉफ्ट्वेयर संबंधी काही कारण काढून वेदीकाने विराटला भेटायला बोलाविले होते. एका हॉटेलमध्ये.

"किती बिझी असतोस तू, तुला तर वेळच नाही माझ्याशी बोलायला." वेदीकाने लाडवत विराटला म्हटले.

"अस काही नाही वेदिकाजी, काम तर असतेच पण तुम्हाला पहिला प्रिफरंस असतो माझा." विराटने हलकेसे हास्य करीत उत्तर दिले.

"बघ विराट, आता अंतिम रेस मध्ये दोनच कंपन्या उरल्या आहेत. एक तुमची आणि दुसरी ती जर्मनीची. जर तू माझ्या काही गोष्टी क्लियर करशील तर मला निर्णय घ्यायला मदत होईल." वेदिकाने अप्रत्यक्षपणे विराटला हिंट दिली होती.

तिच्या मनात वेगळीच डाळ शिजत होती.  OSR टेक्नॉलॉजीलाच प्रोजेक्ट द्यायचा असा तिचा निर्णय झाला होता पण ह्यासाठी विराटचा वापर करून घायचा होता तिला. विराटसारखा मासा फसवायला हे हत्यार चांगलं होतं. प्रोजेक्ट मिळण्यासाठी वेदीकाने थोडेबहुत नखरे पूर्ण करण्यास विराट तयारही होता.

इकडे ओजस्वी विचार करायला लागली होती की विराट आणि वेदिका असं इतकं काय बोलत असेल फोनवर प्रोजेक्टबद्दल. ओजस्वी जेव्हा पण त्याला विचारायची तर तो असंच काहीसं उत्तर देऊन वेळ मारून नेत असे.
... ...

वेदान्तला ओजस्वी आवडली होती आणि तो तिच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न रंगवू लागला होता. त्याने प्रोजेक्टसंबंधी कारण काढून एक दोन वेळा ओजस्वीला फोन पण केला होता पण ओजस्वीने काही जास्त भाव दिला नाही त्याला. त्याच्या वडिलांचा म्हणजेच विनोद शर्मांचा पाठिंबा होता त्याला आणि बाबा मिस्टर रेड्डीशी लग्नाबद्दल बोलले तर आपलं काम होईल याची वेदान्तला खात्री होती. पण त्याच्या आईचा म्हणजेच वेदिका शर्माचा विरोध होता. कारण तिला विराट हवा होता आणि प्रोजेक्ट एक चांगला माध्यम होतं त्याला ब्लॅकमेल करण्याचं.

"तुला काय प्रॉब्लेम आहे लग्नाला? एवढी चांगली मुलगी आहे, चांगली फॅमिली आहे, शिवाय हा प्रोजेक्टपण त्यांनाच द्यायचा ठरवलं आहे, मग तू कश्याला नकार देत आहेस?" वेदान्त ओरडत आपल्या आईला म्हणजेच वेदिकाला म्हणाला.

"अरे बेटा, मी नकार नाही देत आहे, फक्त थोडा धीर धरायला सांगत आहे. वेळ आली की मीच बोलेल तिच्या बाबांशी." वेदिका समजावत म्हणाली.

"मग आताच का नाही, प्रोजेक्टच्या निमित्याने, म्हणजे त्यांना नकार द्यायला पण जागा उरणार नाही" वेदान्त उत्तरला.

"अरे वेदान्त, बिझनेस आणि नातेसंबंध असे मधात आणायचे नसतात. तू विश्वास ठेव माझ्यावर, योग्य वेळ आली की तिला सून बनवून आणूया आपल्या घरी" वेदिकाने स्मित करीत उत्तर दिले.
... ...

ओजस्वी विराटच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आता तिला दिवसरात्र त्याच्या सोबत राहावं किंवा त्याच्याशीच गप्पा मारत राहाव्या असं वाटत असे. ह्या मधल्या दिवसात विराटचं वेदीकाशी फोनवर जे काही बोलणं होत असे त्यामुळे ओजस्वीची जरा चिडचिड होत असे. ह्या प्रोजेक्टच्या चक्करमध्ये विराट आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे असे ओजस्वीला वाटायला लागलं होतं. आज पुन्हा तिचं घर रिकामं होतं. तिने विराटला ऑफिसमधून डायरेक आपल्या घरी बोलाविले. दोघेही घरी गेले. या तीन चार दिवसापासून त्यांच्यात नीट बोलणं झालं नव्हतं त्यामुळे ओजस्वीशी मनमोकळ्या गप्पा मारता येईल म्हणून विराट खुश होता.

तोच एकांत त्यांना पुन्हा मिळाला होता. ओजस्वी थोडी नाराजच होती. तिची नाराजी दूर करण्यासाठी त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या केसातुन हाथ फिरविला. तिच्या सागरासारख्या अथांग अश्या डोळ्यात तो बुडाला होता. तिने आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले.

"तुझे हृदय फार जोरात धडकत आहे रे" ओजस्वी हळूच म्हणाली.

"ती धडकन तुझ्यासाठीच आहे हे तुला ऐकू येण्यासाठी ते जोरात धडकत आहे" विराटने उत्तर दिले.

ह्या रोमँटिक वातावरणात केव्हा त्यांचा श्वासोच्छवास वाढला हे त्यांना देखील कळाले नाही. जणू त्या दिवशीच्या अपुऱ्या क्षणांची कसरच भरून काढत होते ते. फोनही बंद केला होता आज विराटने. त्या कामुक वातावरणात त्यांची कामुकता रंग उधळत होती आणि त्यात ते दोघेही न्हाऊन निघत होते.

आता विराट ओजस्वीच्या बाजूला लेटला होता. हातात हात, वरच्या सिलिंग फॅन कडे दोघांचीही नजर. श्वासोच्छवास पूर्ण नॉर्मल झाला होता.

विराटने ओजस्वीच्या हाताचा किस घेतला आणि म्हणाला,"असं वाटत आहे आज मी जगातल्या सर्वोच शिखरावर आहो आणि आकाशातला चंद्र माझ्या बाजूला येऊन लेटला आहे."

ओजस्वीने विराटच्या कपाळाचा किस घेतला आणि म्हणाली, "मला असं हवं आहे तुझं
माझ्यासोबतच असणं,
सोबतच रडणं
अन सोबतच हसणं."

"वाह ! ओजस्वी, तू प्रत्येक क्षणांची कविता कशी काय करतेस.?" विराटने अगदी निरागसपणे विचारलं.

"नाही रे विराट, मी प्रत्येक क्षणाची कविता नाही करत तर मी प्रत्येक कवितेचा क्षण करते" ओजस्वीने विराटचा हात जवळ घेत उत्तर दिले.

"वाह !!!"
... ...

विराट घरी आला. फार आनंदी होता तो. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता साफ झळकत होती. तिकडे ओजस्वीची पण काही वेगळी स्थिती नव्हती. विराट थकला होता म्हणून आंघोळीला गेला. त्याच्या मोबाईलमध्ये स्वरा गेम खेळत होती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. स्वराने मोबाईल आईजवळ दिला. ओजस्वीचा मेसेज होता तो. संपदाला आश्चर्य वाटले सोबतच विचार पण आला की आता हिने का बरं मेसेज केला असेल म्हणून संपदाने तो मेसेज उघडला. मेसेज वाचून तिला धक्काच बसला.

क्रमशः

सहावा भाग - येथे वाचा.

No comments:

Post a Comment