27 September, 2014

बुक्ससाठी पिग्गी बँक

पुस्तक वाचायची आवड आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते पण आपल्याला आवडणारी सर्वच पुस्तके आपण घेऊ शकत नाही. एक तर ती फार महाग असतात आणी जरी घेतोच म्हटलं तरी 4-5 थोडी जाडजूड पुस्तकं घेतली कि बजेट एकदम दिड-दोन हजाराच्या घरात चालला जातो. एव्हाना ब्रांडेड शर्ट घेताना कि एखादी ओली पार्टी देताना सहज आपण दोन हजार खर्च करून टाकतो परंतु त्याच किमतीची पुस्तक घायची म्हटली कि मग आपल्यातला पैसे बचतीचा किडा जागा होतो. एवढ्या किमतीची पुस्तक घ्यायला नक्कीच आपल्यापैकी बरेचजण धजावत नाही. 

कपड्यावर किवा ओल्या पार्टीवर खर्च होताना कमीच वाटणारी रक्कम पुस्तकं खरेदी करताना जास्त का वाटत असेल..? का आपण पुस्तक घेताना इतका विचार करतो जितका एखादा शर्ट किवा पार्टी करताना करत नाही. साहजिकच याच उत्तर हेच असेल कि, चांगला शर्ट हि आपली गरज आहे आणी आजच्या जमान्यात थोडी फ्याशन तर करावीच लागते आणी पार्टी मुळे जो आनंद मिळतो तो इतर कश्यातच नाही. नक्कीच ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहे. पण काय पुस्तकाची गरज नाही आपल्याला.? आणी पुस्तक वाचल्याने आनंद नाही मिळत आपल्याला.? (आवडते पुस्तक वाचल्याने नक्कीच आनंद मिळतो आपल्याला, परंतु आधी माहीत तर असायला हवं आपल्याला कोणते पुस्तक वाचायला आवडेल ते.?) कदाचित पुस्तक वाचण्याचे फायदे आणी परिणाम तात्काळ नाही मिळणार आपल्याला परंतु काही कालावधीनंतर वाचनाचे नक्कीच फायदे होतात. पुस्तकाचे महत्व खालील गोष्टीने नक्कीच अधोरेखित होईल.

एक 20-21 वर्षाचा तरुण मुलगा असतो. परीक्षेत आणी प्रेमात दोन्ही गोष्टीत अपयश आलेलं.
नैराश्याने ग्रासलेलं. जगण्याची आस संपलेली असते त्याची. आत्महत्या करायला तलावाच्या काठावर जातो. तिथेच एक फाटकं, खराब झालेलं पुस्तक पडलेल असते. तो मुलगा मरायच्या पहिले सहज म्हणून ते पुस्तक चाळतो. एक ओळ वाचतो. दुसरी वाचतो. एक- एक करत पहिलं पान, दुसरं पान करत- करत पूर्ण पुस्तक वाचून टाकतो. ते एका जुन्या लेखकाच प्रेरणादायी पुस्तक असते. पुस्तक वाचून झाल्यावर आत्महत्या करने तर सोडाच पण हा विचार देखील माझ्या मनात कसा आला याची त्याला लाज वाटते. त्या पुस्तकाच्या वाचण्याने पुन्हा त्याच्यात आत्मविश्वास संचारतो. जगण्याची एक नवी उमीद जागी होते. आणी ज्या गोष्टीमुळे आपल्यात इतके मत परिवर्तन झाले त्याच्यातच यापुढे संपूर्ण आयुष्य झोकून द्यायचं ह्या निश्चयाने तो युवक वापस परततो. आणी तो दुसरा- तिसरा कुणीही नसून जगप्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकांचा लेखक ‘स्वेट मार्डन’ होय. त्याने नंतर असंख्य प्रेरणादायी पुस्तके लिहिली जी वाचून लोकांची आयुष्यच बदलून गेली. तर एका पुस्तकाने स्वेट मार्डनच आयुष्य बदलविल आणी त्याच्या पुस्तकाने पुन्हा हजारोंच आणी त्यातील काही लोकांच्या पुस्तकांनी पुन्हा लाखोंच ई. अशी घडत असते पुस्तकाची किमया.

तर महत्वाचा मुद्दा हा होता कि पुस्तकं घ्यायला खर्च येतो आणी त्यासाठी आपण बघणार आहो ह्या पिग्गी बँकची  संकल्पना. हि संकल्पना अगदी सोपी आहे. पिग्गी बँक सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या बालपणी आपण त्यात भरपूर पैसे साठवायचो. आणी मग तो पिग्गी बँक उघडला कि त्या जमलेल्या पैश्यात  छानशी वस्तू वा खेळणी आपल्याला मिळत असे. इथेही आपल्याला हेच करायचं आहे. पण या वेळेस ती वस्तू वा खेळणे म्हणजे पुस्तक असणार आहे. साठविलेल्या पैश्यात्न आपल्याला हवी असणारी पुस्तक घायची. आता तुम्ही म्हणणार हि तर एकदम बालिश संकल्पना झाली. यात काय एवढ..? पण या संकल्पनेचं महत्वं दिसते त्यापेक्षा कितीतरी मोठ आहे.

आपल्या भारतात अजूनही पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची पद्धत तितकीशी रुळलेली नाही जेवढी अमेरिकेत वा युरोपियन देशात आहे. आपल्याला पुस्तक तर वाचायचं असते आणी ते विकत घेण्याची आपली क्षमता देखील असते पण तयारी नसते. याचं सर्वात मोठ कारण आपली टिपिकल भारतीय मानसिकता आहे. भारतीय लोकांना सर्व फुकटच हवं असत आणी तेही दर्जेदार, अस मी नाही तर जागतिक सर्वे सांगतो. आपण कुठलीही गोष्ट म्हणजे software, गाणी, बुक्स ई. इंटरनेटवर  सर्च करताना फ्री software, फ्री गाणी, फ्री बुक्स असं सर्च करतो. फ्री असेल तरच ती आपण Download करतो. आजही गाण्याची किवा फिल्मची लीगल CD विकत घेऊन पाहणारे भारतीय फारच कमी आहे. असो. सांगायचं तात्पर्य एवढंच कि जी गोष्ट software, गाणी ई. बाबतीत लागू होते तीच पुस्तकाच्या बाबतीत लागू होते  पण फ्री पुस्तकं मिळवणे छापील पुस्तकाच्या बाबतीत अजुन तरी शक्य नाही. हा म्हणजे ग्रंथालयातून आणून वाचू  शकतो पण एखादे पुस्तक संघ्रही असावे असे वाटत असेल तर ते विकत घेण्यावाचून पर्याय नाही. आणी त्याकरिता इथे आपल्याला आपल्या पिग्गी बँकचा उपयोग होणार आहे.

म्हणजे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम पिग्गी बँक मध्ये टाकण्यापासून तर आपण बचत केलेले पैसे टाकण्यापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. बऱ्याचदा आपण एखादी वस्तू विकत घेताना त्या वस्तूवर आपल्याला सूट मिळते तेव्हा ते वाचलेले पैसे आपण पिग्गी बँक मध्ये जमा करू शकतो. एखाद्या विकेंडला आपण डिनरला जायचा बेत आखतो आणी काही कारणास्तव आपलं जाणं होत नाही तेव्हा, जर गेलो असतो तर इतके- इतके पैसे खर्च झाले असते असा अंदाज बांधून तेवढे पैसे पिग्गी बँक मध्ये टाकू शकतो. त्याच प्रमाणे एखाद्या सिनेमाच्या सुद्धा बाबतीत अशीच संधी मिळू शकते. व्यसनाधीन व्यक्तीला तर हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो आपले व्यसन कमी करण्याचा. त्या व्यक्तीने काही प्रमाणात जरी व्यसन कमी करून पैसे वाचविण्याचे ठरवले तरी भरपूर पैसे वाचतील आणी त्याच कारणाने काही प्रमाणात का असेना त्याला व्यसन कमी व्ह्यायला मदत होईल. पैसे वाचविण्याचे असंख्य मार्ग आहे त्यातल्या त्यात वायफळ खर्च तर आपण हमखास टाळू शकतो आणी तो पैसा चांगली पुस्तक खरेदीकरिता लावू शकतो. खरतर आपल्याकडे पैसे वाचविण्याकरिता पूर्वी एखादे ठोस कारण नव्हते परंतु एकदा तुम्ही पुस्तकासाठी पैसे वाचवायला सुरुवत केली कि आपोआप आपली बचत वाढत जाईल.  

प्रत्येक वेळेस वाचविलेले पैसे जेव्हा तुम्ही पिग्गी बँक मध्ये टाकाल तेव्हा भलेही ती रक्कम लहान असेल परंतु काही महिन्याच्या या बचतीने सरतेशेवटी एक चांगली मोठी रक्कम आपल्याजवळ उपलब्ध होईल. थेंबे- थेंबे तळे साचल्याप्रमाणे आणी हि रक्कम आपल्या बचतीतून जमा झाल्यामुळे आपण आपल्या रोजच्या खर्चातून मोठी रक्कम पुस्तकावर खर्च करीत आहो असेही वाटणार नाही.मी पण नुकतीच हि संकल्पना राबवायला सुरवात केली आहे. आणी त्याचप्रमाणे इथे पण मांडत आहो जेणेकरून आपल्यालासुधा पुस्तकासंबंधी काही खर्च असा पण भागविता येईल. हि संकल्पना अत्यंत साधी आणी तेवढीच सोपीसुधा आहे. त्यामुळे आपल्यालासुधा वापरून पहायला काय हरकत आहे.? झालाच तर फायला होईल, नुकसान काहीच नाही यात. तर मग करा सुरवात पुस्तकासाठी पैसे वाचवायला. हि बचत नक्कीच भविष्यात चांगले रिटर्न्स देईल.

No comments:

Post a Comment