17 March, 2020

चारोळ्या 56 ते 60

चारोळी  56

हल्ली मी एकटाच असतो
आपल्या जुन्या आठवणी चाळायला,
जड झालेल्या भावना 
अश्रू संगती गाळायला.


चारोळी  57

मला तुझं रुसणं तुझ्या 
हसण्यापेक्षा अधिक भाळते.
मी तुला मानवावं म्हणून 
तू तुझं रुसणं कसोशीने पाळते.


चारोळी  58

काल तिला बघितले 
लायब्ररीत पुस्तक चाळतांना.
स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे 
शिष्ठाचार पाळतांना.


चारोळी  59

मी तिच्यावर कविता करीत नाही 
कारण ती वाचतांना मी हळवा होऊन जातो,
स्वतःच्या अस्तित्वातुनच मग मी 
नकळत वेगळा होऊन जातो.


चारोळी  60

दवबिंदूने प्राजक्त आज भिजेल काय.?
मध्यरात्रीचा चंद्र आज निजेल काय.?
माझ्या निरागस प्रेमाची किती घेशील परीक्षा
एक तपानंतरतरी आज तुझं मन ठिजेल काय.?

इतर चारोळ्या, कविता वाचण्यासाठी शब्दझेपच्या फेसबुक पेजला भेट द्या.-- शब्दझेप

No comments:

Post a Comment