02 April, 2020

चारोळ्या 61 ते 65

चारोळी क्र. 61.

लबाडांच्या गर्दीत 
गाफील मी राहिलो.
सारेच फसवत गेले 
आणी फसत मी राहिलो.

चारोळी क्र. 62.

जेव्हा मी खोटा बोलतो 
तेव्हा मी माझाच राहत नाही.
स्वतःच्याच नजरेला नजर भिडवून 
आरश्यात पाहत नाही.

चारोळी क्र. 63.
पुस्तकाच्या पानात मी 
तिला शोधात राहिलो.
ती शब्द बनून पसरून गेली 
मी चित्रच पाहत राहिलो.

चारोळी क्र. 64.

मी रोज पाहतो 
स्वतःला हरतांना.
अतृप्त इच्छा आणी 
स्वप्नांना मारतांना.

चारोळी क्र. 65.

आजकाल मी 
गर्दीत बसत नाही.
कारण मग मी 
माझाच उरत नाही.

इतर चारोळ्या याचा- Click Here.
कथा वाचा- Click Here.

1 comment:

  1. अनिकेतजी, तुमच्या ब्लॉगला सुद्धा भेट दिली. आणि तुमच्या चारोळ्या वाचून आपण अधिक अभ्यास करायला हवे असे वाटले. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात १० बारा चारोळ्या लिहिल्या आहेत. माझी चारोळीची व्याख्या आपण पहिली आहेच. अधिक गांभीर्याने लेखन करावे.

    ReplyDelete