14 September, 2014

स्व मोटिवेशन

'इतर कुणी आपल्याला जास्तवेळ मोटिवेट करू शकत नाही त्यामुळे मनुष्याने स्व मोटिवेट असावे' अश्या प्रकारचं एक वाक्य वाचनात आलं होत आणी खरच आहे ते. कधीतरी आपणा कुठ्ल्याश्या मोटिवेश्नल सेमिनारला जातो. सेमिनार ऐकतो, खूप प्रेरित होतो आणी त्याच प्रेरणेने बाहेर पडतो. डोक्यात विचारचक्र सुरु असत कि बस, आता आपणपण अगदी असच करायचं. काय तर आपणा आपले वेळापत्रक बदलावितो, उठण्याची वेळ, काम करण्याची पद्धत, अडचणीला सामोरे जाण्याचा दृष्टीकोन ई. हे नेमाने 3-4 दिवस चालते. मग रोजच्या धावपळीच्या कार्यक्रमात ह्या गोष्टी मागे पडतात आणी काही दिवसांनी आपण तीच अनउत्साही जिंदगी जगात असतो. उत्साह कमी किवा संपलेला असते. मग पुढच्या मोटिवेश्नल सेमिनारला जात पर्यंत आपली स्थिती काही सुधरत नाही.

आजच्या धावपळीच्या जीवनात रोजची सकाळ हि प्रेरणादायी असेलच असे नाही. एखादी पहाट तशी उजडलीच तरी इतर ताण तणाव तो उत्साह मारून टाकतात. म्हणून आपल्यासमोर उत्साही जीवन जगण्यासाठी एकच उपाय उरतो तो म्हणजे 'स्व मोटिवेषण'.

मनुष्य कुठेही, केव्हाही आणी कुणाकडूनही मोटिवेट होऊ शकतो. खरतर मोटिवेट होणे हे काही रॉकेट सायन्स नाही. याचे कुठलेच मापदंड नाही. कारण कुठलीशी एखादी छोटीशी गोष्ट मनुष्याला मोटिवेट करेल ते सांगता येत नाही. एक लहानशी मुंगी आपल्या वजनाच्या दसपट वजन उचलते हि गोष्ट एखाद्याला मोटिवेट करते तर एखाद्या लहानश्या बाळाचे हसणे-खिदळणे त्याच्या आईला मोटिवेट करते तर एखाद्याला आपली गरिबी आणी अपयश यातून प्रेरणा आणी जिद्द मिळते आणी तो पुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो. मोटिवेषण मिळण्याकरिता गरज असते ती डोळे, कान उघडे ठेवण्याची आणी त्यामागची प्रेरणा/ उद्देश समजून घेण्याची. त्याच प्रमाणे आपण स्वेट मार्डेन, पाउलो कोएल्हो, रोबिन शर्मा, शिव खेरा यांची पुस्तक वाचून आणी सिक्रेट सारखा व्हिडीओ पाहून स्वतःला मोटिवेट करू शकतो. 

काही दिवसापूर्वी 'क्याथरीन बिगेलो' यांचा 'दि हार्ट लॉकर'(2008) हा सिनेमा पहिला. खरतर हा सिनेमा इराक युद्धाशी निगडीत आहे आणी ह्या सिनेमाला 6 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहे म्हणून पहायचा ठरवलं. सिनेमातली एक गोष्ट मला खूप मोटिवेट करून गेली. सिनेमाचा नायक विलियम जेम्स (जर्मी रेनर) हा U.S. आर्मीचा बॉम्ब डीस्पोझल टीम चा प्रमुख असतो. इराकमध्ये आतंकवाद्यांनी पेरून ठेवलेले बॉम्ब डीस्पोज करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्याची काम करण्याची पद्धत अतिशय धडाकेबाज आणी बेधडक असते. नेहमी जीवावर खेळून तो बॉम्ब डीस्पोज करत असतो.

एका दिवशी त्याचा टीमला एका ठिकाणी बॉम्ब असल्याची खबर मिळते. विलियम नेहमी प्रमाणे बॉम्ब सेफ्टी सूट घालून आपल्या टीम सोबत तेथे पोहोचतो. एका कारच्या मागच्या डिक्कीत RDX भरून असते. त्याची मात्रा इतकी जास्त असते कि जर बॉम्ब दिफ्युज करताना जर तो बॉम्ब चुकून फुटला तर त्या कारच्या आसपासच्या काही मीटर जागेत प्रचंड मोठा खड्डा पडेल व पूर्ण इमारती जमीनदोस्त होईल आणी त्यात त्या बॉम्ब डिस्पोजल विलियम चे तर तुकडे पण मिळणार नाही इतकी त्याची तीव्रता असते.

विलियम तो बॉम्ब पाहून काही क्षणासाठी अस्वस्थ होतो. थोड्या दूर उभ्या असणाऱ्या आपल्या साथीदाराकडे जातो. आपला बॉम्ब सेफ्टी अप्रोन काढतो आणी आपल्या सहकाऱ्याच्या हातात देतो आणी बॉम्ब डिफ्युज करायला त्या कार जवळ जातो. त्याचा सहकारी अचंभित होऊन त्याला याचं कारण विचारतो तेव्हा तो उत्तर देतो," हा बॉम्ब एवढा तीव्र आहे कि जर तो फुटला तर आपणा सर्वेच मरू, अगदी बॉम्ब सेफ्टी अप्रोन घालून असलो तरी, मग मारायचंच आहे तर मग बिनधास्तपणे  बॉम्ब का डिफ्युज करू नये". तो अगदी निर्धास्त होऊन आपल्या कामाला भिडतो आणी बॉम्ब डिफ्युज करतो.

ह्या एका घटनेने मला खूप प्रेरणा दिली. कोणतही काम करायचं तर बिनधास्त, स्वतःला झोकून देऊन करायचं. घाबरत-घाबरत एकही काम धड होत नाही. अश्या छोट्या-छोट्या गोष्टी माणसाला मोटिवेट व्हायला खूप मदत करत असतात. बघा डोळे उघडे ठेऊन आजूबाजूला, रोज अशी एक तरी घटना तुम्हाला दिसेल जी तुम्हाला मोटिवेट करेल.


No comments:

Post a Comment