Showing posts with label प्रेरणादायी. Show all posts
Showing posts with label प्रेरणादायी. Show all posts

28 March, 2019

Motivational Quote HD Typographic wallpaper Free Download 2560x 1440

This is a Motivational Quote HD Typographic wallpaper free to use anywhere in blog, site etc. Feel free to download and comment.

2560x 1440 रिझोल्युशन असलेले HD टाईपोग्राफिक वालपेपर आपल्या पुढे घेऊन येत आहो जे कि अगदी फ्री आहे, आपण आपल्या कुठल्याही ब्लॉगवर किवा पोस्ट मध्ये ह्याचा वापर करू शकता.
वालपेपर कसा वाटला ते कमेंट द्वारे नक्की कळवा.



Get 2560x 1440 HD:- Download

04 June, 2017

वाटण्यातला आनंद (हृदयस्पर्शी कथा)

कालच मित्राला त्याच्या जीवनातील पहिला पगार मिळाला, म्हणाला, "कपडे घायला जाऊया". खूप दिवसापासून दोन जोडी कपड्यावर काम भागवित होता तो. ब्रँडेड कपडे घ्यायचे होते त्याला. कपड्याच्या शोरूम मध्ये ब्रँडेड कपडे बघतांनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. थोड्या वेळाने म्हणाला, "चल दुसरीकडे बघुया".

काय झाले काहीच कळले नाही. मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. साध्या दुकानात. आता तो लोकल कपडे बघू लागला. विचारले काय झाले तर काहीच बोलला नाही. तिथून कपडे घेऊन आम्ही बाहेर पडलो. म्हणाला, "जवळपास दोन हजार वाचलेत".

मला आश्चर्यच वाटलं, कालच पगार झाला, पगारही चांगला, पहिल्या पगारात ब्रँडेड कपडे घेईल म्हणून हा इतके दिवस जीव लावून बसला होता, आणि आता काय झालं अचानक असं.?

16 September, 2014

इतर लोक आपल्याला तेवढंच समजतील जेवढी त्यांची आपल्याला समजून घेण्याची लायकी असेल.

खरतर इतरांनी आपल्याला काय समजावे हे आपल्या हातात नसते. त्यांनी आपल्याला काय समजावे यासाठी आपण प्रयत्न करू शकतो परंतु आपल्याप्रती त्यांचा दृष्टीकोन कसा आहे ह्यावर ते आपल्याला काय समजेल व आपल्याशी कसे वागेल हे ठरत असते. नाहीतर तुम्ही बघा ना, आपण एखाद्याशी खूप प्रेमाने, आपुलकीने वागतो तरी त्याच्या वागण्यातील तुसडेपणा काही केल्या कमी होत नाही किवा झालाच तरी तो फक्त समोरासमोर भासविण्यापूर्ती असतो. तेच एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने, आपुलकीने वागत असते परंतु आपल्याला त्या व्यक्तीबद्दल म्हणावा तितका जिव्हाळा वा आपुलकी निर्माण होत नाही.

एकदा हॉटेल मध्ये काही मित्रांसोबत चहा पित बसलो होतो. गप्पांचा फड रंगला होता. तेवढ्यात बाजूच्या टेबलावरील एक गृहस्थ वेटरच्या नावाने ओरडायला सुरुवात करतो. वेटर लवकर डिलिवरी देत नाही म्हणून तो गृहस्थ त्याला खूप शिव्या देत होता. पण वेटर त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता शांतपणे ते सर्व ऐकून घेत होता. काही वेळाने तो गृहस्थ तावातावाने उघून जातो व वेटर आपल्या कामी लागतो. नंतर जेव्हा वेटर आमच्या टेबलापाशी आला तेव्हा त्याने नेहमी प्रमाणे अगदी स्मितहास्य करून आमची ऑर्डर स्वीकारली. त्याच्या ह्या प्रसन्न रुपाकडे पाहून आम्ही चाट पडलो. मनोजने त्याला विचारले कि एवढा अपमान झाल्यावर सुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य आणी इतक्या शांतपणे तुम्ही कसं काय काम करू शकता...???

14 September, 2014

स्व मोटिवेशन

'इतर कुणी आपल्याला जास्तवेळ मोटिवेट करू शकत नाही त्यामुळे मनुष्याने स्व मोटिवेट असावे' अश्या प्रकारचं एक वाक्य वाचनात आलं होत आणी खरच आहे ते. कधीतरी आपणा कुठ्ल्याश्या मोटिवेश्नल सेमिनारला जातो. सेमिनार ऐकतो, खूप प्रेरित होतो आणी त्याच प्रेरणेने बाहेर पडतो. डोक्यात विचारचक्र सुरु असत कि बस, आता आपणपण अगदी असच करायचं. काय तर आपणा आपले वेळापत्रक बदलावितो, उठण्याची वेळ, काम करण्याची पद्धत, अडचणीला सामोरे जाण्याचा दृष्टीकोन ई. हे नेमाने 3-4 दिवस चालते. मग रोजच्या धावपळीच्या कार्यक्रमात ह्या गोष्टी मागे पडतात आणी काही दिवसांनी आपण तीच अनउत्साही जिंदगी जगात असतो. उत्साह कमी किवा संपलेला असते. मग पुढच्या मोटिवेश्नल सेमिनारला जात पर्यंत आपली स्थिती काही सुधरत नाही.

आजच्या धावपळीच्या जीवनात रोजची सकाळ हि प्रेरणादायी असेलच असे नाही. एखादी पहाट तशी उजडलीच तरी इतर ताण तणाव तो उत्साह मारून टाकतात. म्हणून आपल्यासमोर उत्साही जीवन जगण्यासाठी एकच उपाय उरतो तो म्हणजे 'स्व मोटिवेषण'.

मनुष्य कुठेही, केव्हाही आणी कुणाकडूनही मोटिवेट होऊ शकतो. खरतर मोटिवेट होणे हे काही रॉकेट सायन्स नाही. याचे कुठलेच मापदंड नाही. कारण कुठलीशी एखादी छोटीशी गोष्ट मनुष्याला मोटिवेट करेल ते सांगता येत नाही. एक लहानशी मुंगी आपल्या वजनाच्या दसपट वजन उचलते हि गोष्ट एखाद्याला मोटिवेट करते तर एखाद्या लहानश्या बाळाचे हसणे-खिदळणे त्याच्या आईला मोटिवेट करते तर एखाद्याला आपली गरिबी आणी अपयश यातून प्रेरणा आणी जिद्द मिळते आणी तो पुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो. मोटिवेषण मिळण्याकरिता गरज असते ती डोळे, कान उघडे ठेवण्याची आणी त्यामागची प्रेरणा/ उद्देश समजून घेण्याची. त्याच प्रमाणे आपण स्वेट मार्डेन, पाउलो कोएल्हो, रोबिन शर्मा, शिव खेरा यांची पुस्तक वाचून आणी सिक्रेट सारखा व्हिडीओ पाहून स्वतःला मोटिवेट करू शकतो. 

01 January, 2014

आयुष्य

आयुष्य फक्त एकदाच मिळतं. दुसरा क्षण येतो तेव्हा पहिला क्षण निघून जातो, तो क्षण कसा जगायचा हे आपल्या हातात असतं. येणारा क्षण हा जातोच,  मग तो दुखःत घालवा किवा आनंदात.
प्रत्येक क्षण हि एक संधी असते आणी प्रत्येक संधीत असते एक आशा, स्वप्न पूर्ण करण्याची. प्रत्येक चांगला- वाईट क्षण मिळून माळ बनत असते आणी ती माळ म्हणजेच जीवन. जे क्षण आनंदाने जगलेले असतात ते मोती बनतात आणी इतर बनतात दगड पण मोत्यांचा अहंकार बाळगायचा नसतो आणी दगडांचा तिरस्कार करायचा नसतो. जिथे मोती उपयोगी पडत नाही तिथे दगड उपयोगी येतो. दुखःने घालविलेल्या क्षणाचा उपयोग  सुख वेचण्यासाठी करायचा असतो आणी सुखः - दुखःचा समतोल साधत जीवन जगायचे असते.


- अनिकेत भांदककर.