माझ्याबद्दल






नमस्कार, मी अनिकेत भांदककर. मनातलं कागदावर उतरविलं नसतं तर 'शब्दझेप'ची निर्मिती झालीच नसती. व्यक्त होण्याचं हे एकच साधन मला माहित आहे. कविता, कथा, चारोळ्यातून व्यक्त होत जाणं म्हणजे आपले विचार शब्दात मांडणं. पूर्वी कागदावर आणी आता डिजिटल युग म्हणून ब्लॉग.

2013 ला हा ब्लॉग सुरु केला त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये होतो. परीक्षेच्या दिवसात अभ्यास करत असताना असंख्य विचार मनात यायचे आणी याच विचारांचा हात धरून मी कविता, चारोळ्या करायचो. अभ्यास तर नाही व्हायचा पण एखादी चारोळी, कविता नक्की व्हायची. सुरुवातीला स्थानिक पेपरात द्यायचो कविता. तेव्हा ऑर्कुट होते तर ऑर्कुटवर टाकायचो. नंतर फेसबुक आले आणी तिठे पण कविता टाकायला सुरुवात केली. सोशल नेटवर्किंग साईटवर प्रतिसाद लवकर मिळतो आणी नेमकं कळतं की आपण किती पाण्यात आहो ते. दरम्यानच्या काळात ब्लॉगरवर हा 'शब्दझेप' नावाचा ब्लॉग बनविला.

मी कॉमर्सचा विद्यार्थी परंतु मला वेब डिझायनिंगची आवड असल्यामुळे स्वतःच ब्लॉग बनविला. ब्लॉगिंग आणी वेबसाइट संदर्भात बऱ्याच गोष्टी शिकलो. लिहायला तर आवडायचंच त्यामुळे ब्लॉगिंग जोरदार सुरु होतं. प्रतिसाद हि चांगला मिळायचा. फेसबुकवर शब्दझेप नावाचे पेज बनविले. तिथेही चांगला प्रतिसाद मिळायचा. नंतर स्वतःच्या चारोळ्यांचा डिजिटल म्हणजेच e- चारोळीसंग्रह प्रकाशित केला आणी त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लिहायला अजून हुरूप आला. लिहिणं हि सहज प्रक्रिया आहे असं मला वाटतं. म्हणजे ओढून ताणून एखाद्या विषयावर लिहिण्यापेक्षा जसं सुचत जाईल तसं लिहायला पाहिजे आणी मग आपोआप रचनेची निर्मिती होत जाते.

मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्याने ग्रॅज्युएशनमध्येच शेयर मार्केट, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, बॅलन्सशीट ई. गोष्टींशी संबंध आला. मग तेव्हापासूनच शेयर, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात झाली. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बचत आणी गुंतवणुकीतला फरक कळाला. कंपाउंड इंट्रेस्टला जगातला आठवा अजूबा का म्हणतात ते कळालं. त्याचा थोडा फायदा आपण पण उचलावा म्हणून व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या सागरात उडी घेतली.
"Don't work hard for money, let your money work hard for you" या रॉबर्ट कियॉसाकीच्या सुविचाराचा माझ्यावर प्रभाव आहे आणी त्याच दिशेने सध्या वाटचाल सुरु आहे.

फायनान्स, वेब डिझायनिंग आणी लिखाण, या तीन गोष्टी मला अत्यंत प्रिय आहे. पण कुणा एका गोष्टीत स्वतःला झोकून देणं म्हणजे बाकी दोन गोष्टींवर अन्याय होईल. या तिन्ही गोष्टी मिळून काहीतरी शाश्वत करता येईल का असा मार्ग शोधण्यावाचून गत्यंतर नाही. शेवटी आपल्याला असलेली आवड, नॉलेज आणी स्किल्स यांचा ताळमेळ साधून श्रुजनशील गोष्टीची निर्मिती होत असते. न थकता, स्वतःला झोकून देऊन अविरात्र कार्य करायचं असेल तर या तिन्ही गोष्टीची मूठ बांधणे गरजेचं आहे.

शब्दझेपचे फेसबुक पेज :- येथे क्लिक करा.

माझी फेसबुक प्रोफाईल :- येथे क्लिक करा.

माझे Instagram पेज :- येथे क्लिक करा.

2 comments:

  1. नमस्कार सर,
    तुमच्या कविता आणि लेख वाचले. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दांत प्रत्येकाच्या मनातल्या भावना तुम्ही मांडल्या आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.

      Delete