16 October, 2019

अनकंट्रोल्ड - भाग 7 (अंतिम भाग)


सहावा भाग- येथे वाचा.

ओजस्वीला दारात बघून विराटला धक्काच बसला. तशीच परिस्थिती ओजस्वीची झाली होती. विराटला असं बघून ओजस्वीच्या पायाखालची जमीनच सरकली.

"ओजस्वी तू इथे?" विराटने शॉक होत विचारले.

"हे तर मी विचारायला पाहिजे, तू इथे कसा या हॉटेल रूम मध्ये" ओजस्वीने रागात विचारले दिले.

"अग मिटिंगसाठी आलो होतो मी इथे"

"मिटिंग? ह्या असल्या मिटिंग्स करता तुम्ही?" विराटला मधेच थांबत ओजस्वी बोलली.

"अग तुझा गैसमज झाला आहे, तसं काही नाही आहे. मी समाजवितो तुला सर्व" विराट अगदी गयावया करीत ओजस्वीला म्हणाला.

"बास झालं विराट, काहीही समाजविण्याची गरज नाही आहे", ओजस्वी ओरडली आणि पुढे म्हणाली "मला वाटलं नव्हतं रे तू प्रोजेक्ट मिळविण्यासाठी या थराला जाशील. तुझ्यावर विश्वास करून खूप मोठी चूक केली मी." ओजस्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

"असं नाही आहे ओजस्वी, आधी तू माझं एकूण तर घे...."

ओजस्वी बाहेर निघाली आणि डोळे पुसत जायला लागली. विराट तिच्या मागे धावला. थोड्याच दूर गेल्यावर विराटने ओजस्वीचा हात पकडून थांबविण्याचा प्रयत्न केला.

"ओजस्वी प्लिज थांब, एकूण घे माझं, तसं काहीच नाही आहे, तुझा गैरसमज झाला आहे ग.." विराट विनवणी करू लागला.
"विराट, हात सोड माझा, मला काहीही ऐकायचे नाही आहे, उगीच तमाशा नको करूस इथे." ओजस्वी रागात बोलली. तिने एक झटका दिला तसा विराटच्या हातून तिचा हात सुटला. आणि ती भराभरा जायला लागली. तिला पुन्हा थांबवायची त्याची इच्छा झाली पण उगाच हॉटेलमध्ये हे सर्व बरोबर दिसणार नाही म्हणून तो परत रूम मध्ये गेला. वेदिका उठून बेडवर बसली होती.

"काय करताय मॅडम तुम्ही हे?" विराटने रागात ओरडत वेदिकाला प्रश्न केला.

"विराट आधी शांत हो..." वेदिकाने विराटला शांत करण्याचा प्रयत्न केला.

"काय शांत होऊ, ह्या साठी आलो होतो का मी मिटींगला? आणि हे काय करत होता तुम्ही?"

"विराट आधी तू शांत हो, तुला वाटत आहे तेवढं काहीही झालेलं नाही." वेदीकाने शांतपणे उत्तर दिले. तिची वोडका पण आता उतरली होती.

"काय? म्हणजे काहीतरी करायच्याच उद्देशाने तुम्ही मला इथे बोलावलं होतं वाटते"

"विराट, तू का एवढा हायपर होत आहेस? अश्या मोठमोठ्या डिल मध्ये ह्या गोष्टी कॉमन आहे. बिझनेस वाढविण्याची हि अघोषित पद्धतच आहे जी तुझ्यासाठी नवीन असेल माझ्यासाठी नाही." वेदीकाने अगदी शांतपणे उत्तर दिलं.

"वाहहह ! म्हणजे इच्छा नसली तरीही?"

"इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? साधं गणित आहे, काहीतरी पाहिजे आहे तर काहीतरी द्यावं लागेल. फुकट काहीच मिळत नाही या जगात. प्रोजेक्ट तर नाहीच नाही." वेदीकाने उत्तर दिले.

"मला नाही पाहिजे तुमचा प्रोजेक्ट, तो पण अश्या पद्धतीने. तुमच्यामुळे त्या ओजस्वीचा पण गैरसमज झाला, छे, सगळी वाट लागली." विराट रागातच बोलत होता.

"ओजस्वीची चिंता तू नको करुस. ती आमच्या घरची होणारी सून आहे." वेदीकाने मोठ्या ऐटीत उत्तर दिले.

"काय? तुमच्या घरची सून?" विराटने शॉक होत विचारले.

"हो, वेदान्तची होणारी बायको. मी तुला आधीच सांगितलं होतं, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं." वेदीकाने हसत उत्तर दिले.

विराटला समजत नव्हते आता काय करावं. डिल पण फसली. ओजस्वी पण रुसली. तिकडे आधीच बायको नाराज होती. तो तसाच ऑफिसकडे निघाला. वाटेत त्याने ओजस्वीला फोन केले पण तिने त्याचा एक पण फोन उचलला नाही. ऑफिसमध्ये पण नव्हती ती. तो तसाच घरी गेला, निराश आणि हताश.

विराटला अस उदास बघून संपदाला वाटलं कि मी बोलत नाही म्हणून विराट उदास आहे. तिने विराटशी बोलण्याचा प्रयन्त केला  पण तो जास्त काही बोलला नाही. विराटला आपल्या कर्माचा पश्चाताप व्हावा आणि त्याने पुन्हा असे करू नये म्हणून संपदाने थोडे ताणून धरले होते, पण विराटची हि अवस्था पाहून तिला वाटत होते की विराटला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असावा. बाहेर प्रोजेक्टसाठी काय घडले या बद्दल तिला काहीच माहीती नव्हते.
... ...

ऑफिसला जायची विराटची बिलकुल इच्छा नव्हती. प्रोजेक्टमध्ये पण आता त्याला रस राहिला नव्हता. फक्त ओजस्वीला सर्व समजावून सांगायचे होते आणि तिचा गैरसमज दूर करायचा होता एवढ्यासाठीच तो ऑफिसला गेला. ओजस्वी ऑफिसला आली नव्हती. तिचा फोन पण स्विच ऑफ होता. तो आपल्या कॅबिनमध्ये बसून विचार करू लागला. पुढे त्याला सर्व अंधार दिसत होता. काय करावे, गोष्टी कश्या ठीक कराव्या, काही सुचत नव्हते. तेवढ्यात रेड्डी सरांचे बोलाविणे आले. विराट त्यांच्या कॅबिनमध्ये गेला.

"काँग्रेज्यूलेशन विराट! तुझी मेहनत, तुझं डेडिकेशन कामी आलं" रेड्डीनी आनंदात विराटच अभिनंदन केलं.

विराटला कळलंच नाही काय झालं ते. "कशाबद्दल?" विराटने विचारलं.

"अरे आपल्याला वेदिका ऑटोचा प्रोजेक्ट मिळाला आहे तो पण आपण कोटेशन दिलेल्या प्राईजमध्ये." रेड्डी उत्तरेले.

"व्वाव, तुमचं पण अभिनंदन सर" खोटे हास्य आणि उत्साह आणत विराट बोलला. तरी त्याला कळत नव्हतं हि हे प्रोजेक्ट कसं काय मिळालं ते. काल जे घडलं त्यावरून तो काही असला अंदाज बंधू शकत नव्हता.

"मला माहित आहे तुला प्रश्न पडला असेल कि वेदिका ऑटोने आपल्याला हा निर्णय केव्हा कळविला ते?"
विराटने मान हलविली.

"काल सायंकाळी तुमची मिटिंग झाली त्यानंतर मिसेस वेदिकाचा मला कॉल आला आणि त्यांनी प्रोजेक्टसंबंधात अर्जंट भेटायला बोलाविले. तेव्हा त्यांनी कळविले कि आमच्या बोर्ड मेंबर्सनी तुमच्या ERP सॉफ्टवेयरची निवड केली आहे आणि हा कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हाला देत आहो म्हणून." रेड्डी आनंदात सांगत होते.

विराट विचारात पडला. काल सायंकाळी जे घडलं त्या नंतर हा प्रोजेक्ट आपल्याला मिळेल असं त्याला वाटत नव्हतं. परंतु यात वेदीकाची नक्कीच काहीतरी खेळी असनार हे त्याने ओळखलं.

"आणि पुन्हा एक खुशखबर आहे " रेड्डी उत्तरले तसं विराट आपल्या विचारातून बाहेर आला.

"काय?"

"त्यांनी ओजस्वीची मागणी घातली आहे. म्हणजे त्यांना ओजस्वी पसंद आहे आणि ते तिला आपल्या घरची सून करायला तयार आहे" रेड्डीनी आनंदात उत्तर दिले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद साफ झळकत होता.

हे एकूण विराटला अजून धक्का बसला. तो अजून गर्भगळीत झाला. मागच्या 2 3 दिवसापासून त्याने मोठंमोठे धक्के खाल्ले होते. तो आता हताश झाला होता. त्याला कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता.

"ओजस्वी काय म्हणाली यावर? ती तयार आहे का लग्नाला?" विराटने प्रश्न केला.

"तिच्या चांगल्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. एवढी चांगली फॅमिली, चांगले लोक, शिवाय समाजात मोठं नाव आहे त्यांचं. असं नातं स्वतःहूनच चालून आल्यावर कोण नकार देईल आणि तुला तर हे चांगलच ठाऊक आहे की आपल्या कंपनीला वाचविण्यासाठी हा प्रोजेक्ट आणि त्यांच्या कंपनीची साथ जरुरी आहे ते." रेड्डी सांगत होते.

"पण सर, लग्नाचा निर्णय असा अचानक..."

"बघ विराट, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. अश्या मोठमोठ्या डिल मध्ये ह्या गोष्टी कॉमन आहे." रेड्डी उत्तरले.

हे एकूण विराटच्या अंगावर काटा आला. हेच वाक्य त्याने वेदिकाच्या तोंडून ऐकले होते. त्याला ह्या कोणत्याच गोष्टी पटल्या नाही पण तो तरी काय करणार, त्याचा नाईलाज होता. तो काहीच करू शकत नव्हता. त्याची घुसमट व्हायला लागली.
तो आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसला. आता त्याच डोकं हँग झालं होतं. त्याला समजत नव्हते कि काल आपण हॉटेलमध्ये वेदिकासोबत होतो हे ओजस्वीला कसं काय कळालं

त्याने फोन उचलला. ओजस्वीला फोन लावला. फोन बंद होता. त्याला बोलायचं होत एकदा ओजस्वीशी, तिला सांगायचं होत कि तू पाहिलं ते खरं नव्हतं, तिला सांगायचं होतं की मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो म्हणून, तिला सांगायचं होतं की मी प्रोजेक्टसाठी खालच्या थराला जाणारा व्यक्ती नाही म्हणून. त्याने एक लेटर लिहिले आणि त्यावर सही करून ते HR डिपार्टमेन्टकडे दिले. आपले काही महत्वाचे सामान घेतले आणि ऑफिसच्या बाहेर पडला तो कायमचाच.

त्याने नौकरी सोडली होती. घरी येऊन पुन्हा एकदा संपदाची माफी मागितली. आपली चूक दुरुस्त करून संपदाचा पुन्हा विश्वास संपादन करण्याची ही चांगली संधी होती. तिचा राग निवळला होता. त्याने नौकरी सोडल्याचे एकूण तिला धक्का बसला. पण त्याने सांगितले की ओजस्वीशी कायमचे संबंध तोडण्यासाठी हे जरुरी होतं म्हणून. संपदाने प्रेमाने त्याला मिठी मारली. विराटने पुणे कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला. बंगलोरला बऱ्याच सॉफ्टवेअर कंपन्या आहे, येथील अनुभवाच्या आधारावर तेथे नक्की चांगली नौकरी मिळेल याची त्याला खात्री होती शिवाय त्याने आपल्या बंगलोरला असलेल्या एक दोन मित्रांना देखील सांगून ठेवले.

रात्री दहाच्या सुमारास विराटचा फोन पुन्हा एकदा वाजला. ओजस्वीचा फोन असेल म्हणून त्याने लगेच फोन बघितला, वेदिकाचा फोन होता तो. या आधी रेड्डी सर आणि कंपनीतल्या इतर सिनियरचे फोन येऊन गेले होते पण विराटने एकचा पण फोन उचलला नव्हता. पण त्याने वेदीकाचा फोन उचलला.

"आता कश्यासाठी फोन केला?" विराटने रागातच विचारले.

"मी ऐकलं, तू नोकरी सोडलीस?" वेदीकाने प्रश्न केला.

"हो, तुम्हाला काय त्याच? कामाचं तेवढं बोला"

"तू टॅलेंटेड आहेस, हार्डवर्किंग आहेस, मला असं वाटत तू आमच्या कंपनीत जॉब करावास. तुला अजून चांगली पोझिशन आणि चांगलं पॅकेज देऊ." वेदीकाने ऑफर दिली.

विराट मोठ्याने हसला आणि म्हणाला "नाही हो, नाही जमणार कारण तुमच्यासारखं कुठल्याही थराला जाणं नाही जमत मला."

"ठीक आहे, तुझ्यासाठी आमच्या कंपनीची ऑफर नेहमीच खुली असेल पण एक लक्षात ठेव विराट, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं." वेदिका उत्तरली.

विराटने फोन कट केला. स्वतःला कंट्रोल न करण्याची एवढी मोठी किंमत त्याला चुकवावी लागली होती. त्याने मोबाईलमधून सिम कार्ड काढले, ते तोडले आणि डस्टबिनमध्ये फेकले.

समाप्त.

No comments:

Post a Comment