Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

31 March, 2023

निरोप समारंभ कविता | Send Off Poem in Marathi

Send Off Poem in Marathi

बरेच दिवस झाले, वर्ष झाले काही लिहिलं नाही. कथा नाही, कविता नाही, एवढच काय तर एखादी चारोळी पण नाही. रोजच्या स्पर्धेत आणि जगण्याच्या धावपळीत आवड, छंद कुठे, कसा मागे पडला कळलेच नाही. कालांतराने पैसाच आवड, छंद, गरज सर्वकाही होऊन जातो. कलेने मानसिक भूक भागेलही पण पोटाची भूक, आर्थिक भूक भागवायला पैसाच लागतो हेच सत्य आहे. पण तरीही कलेसाठी, छंदासाठी वेळ काढायला पाहिजे हे देखील गरजेचं आहे.

आज कविता लिहायला एक निमित्य झाल, ते असं की, मित्राच्या ऑफिसमधील एक सहकारी निवृत्त होणार होता आणि त्यांच्या निरोप समारंभात मित्राला एक निरोप कविता त्यांच्यासाठी म्हणायची होती. त्याने मला ह्यावर एक कविता लिहिण्याची विनंती केली. वर सांगितल्या प्रमाणे वर्ष उलटले असतील मी काहीच लिहिले नव्हते, त्यामुळे शब्दच सुचत नव्हते. तरी प्रयत्न केला आणि खालीलप्रमाणे कविता झाली....

(निरोप समारंभात निरोप घेणार्‍या सहकार्‍याला उद्देशून )

14 June, 2017

पहिला पाऊस



पहिला पाऊस खूप काही देऊन जातो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या जीवांना सुखावून जातो. उन्हाने करपलेल्या, भेगा पडलेल्या ओसाड धरतीला भिजवून जातो. पहिल्या पावसात मातीचा येणारा सुगंध तर काही अप्रतिमच असतो. कडक उन्हाने जीवाची जी काही लाही लाही झाली असते ती पहिल्या पावसाने अगदी घामासकट धुवून निघते. ते टपोरे पाण्याचे थेंब भलेही टोचणारे असतील पण ते आता हवे हवेसे वाटतात. ओले झालेले कपडेसुधा आनंदाने बदलावेसे वाटतात. डोक पुसत मग वाफाळलेला चहा घेत खिडकीत बसुन नुसतंच त्याला पाहत बसावसं वाटतं. आणी मग मनात विचारांच जे काहुर माजतं ते असं......

आभाळ गडगडलं, विजा चमकल्या 
ढगांनी वेढलं तळपत्या सूर्याला.
थेंबामागून थेंब जमिनीवर पडला 
काळ्या मातीतुन सुगंध दरवळला.

आल्या सरी रीप-झिप करीत 
भणंग धरतीला ओल्या करीत.
आधी टपोरे थेंब, मग टपोऱ्या गारा 
न्हाऊन निघाला हा परिसर सारा.

सुखावली मनं, शांत झाली धरती 
उपकार त्याचे जो वरूण आहे वरती.
थोडा अजुन बरस, मज शांत भिजू दे 
घामाच्या धारासाहित निराशा पुसू दे.

चिंब हि धरती अन गार हा वारा 
तुझ्या कवेत आज, हा विश्व सारा.
उधळू दे रंग मज तू माझ्या मनाचे
विश्वाच्या रंगात इंद्रधनुष्य प्रेमाचे.

टाक इवलासा कटाक्ष या धरतीकडे 
बघ किती आनंदले इवलेसे गाव माझे. 
सुखावले गावकरी तुझ्या आगमनाने 
पुजतील तुला जन्मभर अभिमानाने.

असाच बरसात रहा चोहीकडे 
पुन्हा दुष्काळ आम्हा देऊ नकोस. 
गावकऱ्याच्या च्या भावनांशी
असा लपून- छपून खेळू नकोस. 

आजचा दिवस तुझ्या संगतीत गेला.
तुझ्या वाचुन फक्तच उन्हाळा नी हिवाळा.
असेच उपकार कर या धर्तीवर 
आमचाही असंच तुझ्यावर जिव्हाळा.

- अनिकेत भांदककर 

05 March, 2017

प्रेमपत्राची होडी करून वाहत होता



मेहंदीने रंगलेला तिचा हात लाल होता पण 
तो त्याच्यासाठी नव्हता म्हणुन त्याचा जीव जात होता.

जरी ओठांवर हसू लोळत असले तरी 
मनातून तो उदास गाणे गात होता.

आता लग्नही जुळाले होते तिचे दुसरीकडे
तरी आशेखातर तो मामाकडे जात होता.

तिला नाही म्हणणे त्याला कधी जमलेच नाही
नसतांनाही भूक तो घासावर घास खात होता.

स्वतःच्या प्रेमालाच तो स्वतःच्या डोळ्यांनी 
अलगद परकं होतांना पाहात होता.

तिच्या आठवणीच्याच सागरात मग तो 
प्रेमपत्राची होडी करून वाहत होता.

- अनिकेत भांदककर.

28 February, 2017

माझ्यासाठी परत एकदा जगुन तर बघ...


 


माझ्यासाठी परत एकदा जगुन तर बघ...हि कविता ऐकण्याकरिता वरील विडीयोवर क्लिक करा.

कवितेचा विडीयो येथून डाउनलोड करा- Download

02 August, 2016

तेरी रजरोंने मेरी नजरोंसे कुछ बात की है


तेरी रजरोंने मेरी नजरोंसे
कुछ बात की है,
युही आखोने आखोसे
सौगात की है।

न जाने तु कुछ इजहार करना चाहती है।
नजरोंसे कुछ बात बया करना चाहती है।
मै हु यहा तु बस इजहार कर।
आखोंसे मुझसे कुछ बात कर।

17 July, 2016

ना हम बरबाद होते

ना तु भाव देती
न हम पिछे आते

ना तु मुडके देखती
ना हमे प्यार होता

ना तु रुकती
ना हम बात करते

ना तु शरमाती
ना हम आगे बढते

ना ये सिलसिला शुरू होता
ना हम इसमे बेहते जाते

तो जिंदगी वैसेही होती
जैसे पेहले थी

ना हम प्यार मे पडते
ना बरबाद होते.

19 June, 2016

चल उठ मर्दा



चल उठ मर्दा 
घे हातात कुदळ
खोदुन काढ जमीन 
आळस कश्याला.?

चल उठ गध्या
माय राबतेय तुझी 
घे ओझे पाठीवर 
असा लोळतोस काय.?

चल उठ राया 
घे हातात नांगर 
नांगरून काढ शेत 
बैलावर ओझं कश्याला.?

चल उठ कोळ्या 
पुन्हा जाळे फेक 
अडकेल मासा 
प्रयत्नांशी परमेश्वर.

चल उठ पोरा 
पाड फडश्या पुस्तकाचा 
येईल तितकं लिही 
नक्कल कश्याला.?

चल उठ मंत्र्या 
किती करशील लुच्चेगिरी?
रयतेची सेवा 
कधी तरी करशील.?

चल उठ मर्दा 
लढ थोडा हिमतीनं 
घाबरून जाऊन कुणी 
जग जिंकत नाही.

© अनिकेत भांदककर.

शब्दझेपचे फेसबुक पेज:- www.facebook.com/shabdjhep

21 March, 2016

तिच्यासाठी झुरणाऱ्या एका वेड्यातर्फे.....



कधीतरी वेळ काढुन चार क्षण आठव मला 
तुझ्या स्वप्नातील गावात थोड्यावेळासाठी पाठव मला.
मी इतका खास नसलो तरी आडोश्याला ठेव मला 
तुझ्याप्रती असणाऱ्या माझ्या भावनांचा तुला त्रास होणार नाही 
आणी मला तुझ्या स्वप्नांच्या गावत राहता येईल...एवढंच.....

मला तुला पहायचंय तुझ्या स्वप्नांच्या गावात हसतांना 
तुझ्या स्वप्नांच्या गावात मी तुझ्यासाठी अनोळखी असलो
तरी तू मात्र माझ्यासाठी खासंच असशील....

अधुन- मधून एखादा कटाक्ष टाकत जा माझ्यावर
कदाचित तुला यात काहीच वाटणार नाही 
पण मला खुप आनंद मिळेल, माझी स्पंदने वाढेल
मग जग जिंकल्याची भावना येईल माझ्यात
पण मी आवरेल स्वतःला, माझ्या भावनेला.....

या वेळेस मात्र मी गैरसमज करून घेणार नाही 
कि तु मला भाव देत आहेस म्हणुन,
आणी उगाच तुझा मनस्ताप वाढविणार नाही......

तुझ्या जीवनात माझ्यापेक्षाही खुप खास लोक असतील
त्यांच्या एवढी किंमतही नसेल मला कदाचित 
पण, मी माझ्या हृदयाला चांगलाच ओळखतो
तो उगीच असा कुणासाठी धडकणार नाही.....

तुझ्या नजरेचे भाव काहीतरी वेगळंच सांगतात
जे तु माझ्यापासून लपवतेस नेहमी,
कितीही नाही म्हटलं तरी आपली नजरानजर होतेच एकदातरी 
तेव्हा तुझ्या हृदयाचे ठोके चुकतात का ते माहित नाही 
पण माझ्या हृदयाचे नक्कीच चुकतात....

तरी मी तुझ्याकडून काहीच अपेक्षा करणार नाही
तुला कसलीच विचारणा करणार नाही 
फक्त एक करेल, तुझ्यावर बिनधास्त प्रेम करेल 
आणी त्या प्रेमात रोज झुरेल.....

कारण, त्यात जी नशा आहे ती अजुन दुसऱ्या कश्यातच नाही.

11 October, 2015

पण जगायचे राहून गेले....


(जिवनात काही गोष्टी करायच्या राहुन जातात)

पडत होता पाउस 
पण भिजायचे राहून गेले,
कुशीत होतो आईच्या 
पण निजायचे राहुन गेले.

वाजत होता ढोल 
पण नाचायचे राहुन गेले,
ऐकत होतो जोक्स 
पण हसायचे राहुन गेले.

जळत होतं मन 
पण विझवायचे राहुन गेले,
फाटलं होतं काळीज 
पण शिवायचे राहुन गेले.

समोर होती ती 
पण बघायचे राहुन गेले,
सोबत होते मित्र
पण जगायचे राहुन गेले.

© अनिकेत भांदककर.

26 July, 2015

इथे जगावं लागतं...



ह्या दुनियात राहून प्रत्येक 
रहस्याला लपवावं लागतं,
हृदयात कितीही दुखः असो 
परंतु इथे हसावं लागतं.
-
कितीही एकटं रहावसं वाटलं 
तरी गर्दीत बसावं लागतं,
प्रामाणिकपणा बाजूला सारून 
लबाड असावं लागतं.
-
झाल्या कितीही वेदना
तरी इथे चालावं लागतं,
मरत-मरत का असेना 
प्रत्येक क्षण जगावं लागतं.
-
© अनिकेत भांदककर 

16 July, 2015

अश्रू का गळतात.....?

Tear

दुखःच्या क्षणी संवेदनशील होतात,
वाट मोकळी करून पटकन टपकतात, 
कुणास ठाऊक अश्रू का गळतात...?

आनंदाच्या क्षणी डोळे भरून येतात, 
इवलीशी जागा स्वतः व्यापून घेतात,
कुणास ठाऊक अश्रू का गळतात...?

कुणी रागावल्यास स्वतः रुसून बसतात, 
तडत- फडत डोळ्या बाहेर पडतात, 
कुणास ठाऊक अश्रू का गळतात...?

कदाचित त्यांनाही हसायला आवडत असेल, 
म्हणून दुखःच्या क्षणी त्यांनाही रडू येत असेल.

स्वतःला डोळ्यातून काढून ते
मनावरचं दुखः स्वतः घेत असतील, 
माणुष्याचे दुखः हलके व्हावे 
म्हणून स्वतः खपत असतील.

त्यांनाही हसनं आवडत असावं 
म्हणून त्यांचही अवसान गळत असावं.

गालावरून उतरून त्यांनाही
ओठांना भेटावसं वाटत असेल, 
ओठांना जादूची झप्पी देऊन 
त्यांनाही हसावसं वाटत असेल.

इतरांसाठी स्वतः झुरतात 
सुखः- दुखःत नेहमी साथ देतात 
त्याग हेच कर्तव्य मानतात 
कदाचित, म्हणून अश्रू गळतात.

© अनिकेत भांदककर.

18 June, 2015

पहिला पाऊस

Rain


पहिला पाऊस खूप काही देऊन जातो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या जीवांना सुखावून जातो. उन्हाने करपलेल्या, भेगा पडलेल्या ओसाड धरतीला भिजवून जातो. पहिल्या पावसात मातीचा येणारा सुगंध तर काही अप्रतिमच असतो. कडक उन्हाने जीवाची जी काही लाही लाही झाली असते ती पहिल्या पावसाने अगदी घामासकट धुवून निघते. ते टपोरे पाण्याचे थेंब भलेही टोचणारे असतील पण ते आता हवे हवेसे वाटतात. ओले झालेले कपडेसुधा आनंदाने बदलावेसे वाटतात. डोक पुसत मग वाफाळलेला चहा घेत खिडकीत बसुन नुसतंच त्याला पाहत बसावसं वाटतं. आणी मग मनात विचारांच जे काहुर माजतं ते असं......


आभाळ गडगडलं, विजा चमकल्या 
ढगांनी वेढलं तळपत्या सूर्याला.
थेंबामागून थेंब जमिनीवर पडला 
काळ्या मातीतुन सुगंध दरवळला.

आल्या सरी रीप-झिप करीत 
भणंग धरतीला ओल्या करीत.
आधी टपोरे थेंब, मग टपोऱ्या गारा 
न्हाऊन निघाला हा परिसर सारा.

सुखावली मनं, शांत झाली धरती 
उपकार त्याचे जो वरूण आहे वरती.
थोडा अजुन बरस, मज शांत भिजू दे 
घामाच्या धारासाहित निराशा पुसू दे.

चिंब हि धरती अन गार हा वारा 
तुझ्या कवेत आज, हा विश्व सारा.
उधळू दे रंग मज तू माझ्या मनाचे
विश्वाच्या रंगात इंद्रधनुष्य प्रेमाचे.

टाक इवलासा कटाक्ष या धरतीकडे 
बघ किती आनंदले इवलेसे गाव माझे. 
सुखावले गावकरी तुझ्या आगमनाने 
पुजतील तुला जन्मभर अभिमानाने.

असाच बरसात रहा चोहीकडे 
पुन्हा दुष्काळ आम्हा देऊ नकोस. 
गावकऱ्याच्या च्या भावनांशी
असा लपून- छपून खेळू नकोस. 

आजचा दिवस तुझ्या संगतीत गेला.
तुझ्या वाचुन फक्तच उन्हाळा नी हिवाळा.
असेच उपकार कर या धर्तीवर 
आमचाही असंच तुझ्यावर जिव्हाळा.

© अनिकेत भांदककर.

08 March, 2015

ती एक व्यक्ती, जी महिला असते.













(Dedicated to All Women)

स्वतःचा अभ्यास सोडून
जी आपली असाईनमेंट पूर्ण करून देते
ती आपली मैत्रीण, जी महिला असते.

दादाचं अफेयर माहीत असूनही
जी आपल्या वडिलांपासून लपविते
ती आपली बहिण, जी महिला असते.

आई गावाला गेल्यावर
जी आग्रहाने घरी जेवायला बोलविते
ती शेजारची काकू, जी महिला असते.

बाबांनी कुल्फी खायला नकार दिल्यावर
जी स्वतःहुन पैसे देते
ती आपली आजी, जी महिला असते.

स्वतःला भूक लागुनही
जी नवरा येत पर्यंत जेवत नाही
ती आपली बायको, जी महिला असते.

स्वतःउपाशी राहूनही
जी आपल्या तान्ह्याला भरविते
ती आपली आई, जी महिला असते.

आप्तेजणांवर येणाऱ्या संकटाला
जी स्वतः समोर जाते
ती एक व्यक्ती, जी महिला असते.

सारं दुख सोसुनही
जी कुटुंबाला सुखात ठेवते
ती एक व्यक्ती, जी महिला असते.

© अनिकेत भांदककर.
     08-03-2015

14 August, 2014

क्यु दोडते हो इतना पैसो के पिछे...??

क्यु दोडतेहो इतना
पैसो के पिछे.?
क्या इसे उपर 
ले जाओगे.?

माना खरीद भी ली
इन पैसो से BMW,
फिर भी क्या जिंदगीभर
खुश रेह पाओगे.?

क्या है वो चीज 
जो आपको ख़ुशी देगी.?
क्या उसकी भी
किमत लगा पाओगे.?

हर एक चीज 
पैसो मे नापकर,
क्या सचमे जिंदगी
ख़ुशी से जी पाओगे.?


24 May, 2014

अंतरंग













क्षणभर घ्यावा एक विसावा
आपल्या अंतरंगाचा
मोर त्यात दिसावा.

फुलवून पिसारा अंतरंगाचा
प्रेमबंधाचा रंग त्यात भरावा.

स्पर्शिले ज्यांनी अंतरंग आपले
त्यांचा रंग त्यात मिसळावा.

तोडिले ज्यांनी बंध आपले
एक कोपरा त्यांचाही असावा.

जपले ज्यांनी अंतरंग आपले
अंतरंगाचा जीव त्यास म्हणावा.

विविध पैलू अंतरंगाचे
रंगरंगुनी उघडावे दर मनाचे.

मनस्वी पाझरणे प्रत्येक क्षणाचे
काळीज तोडी इवल्याश्या अंतकरणाचे.

तुटल्या अंतकर्णातल्या प्रत्येक तुकड्यात
प्रियजनांचा गंध असावा
त्यात आपल्या अंतरंगाचा मोर दिसावा.  

16 April, 2014

निवडणूक

आली निवडणूक 
वाजला दिंडोरा,
गल्ली-बोळ्यात  
नेत्यांचा हिंडोरा.

कुणाला जयभीम 
कुणाला राम-राम, 
उन्हात फिरून नेत्यांचा 
निघतोय घामच-घाम.

जमविली पोर 
आणल्या गाड्या,
प्रचारासाठी आता 
राल्याच-राल्या.

कुणाला मोबाईल
कुणाला देशी,
निवडणुकीच्या दिवसात 
नाहीच राहत कुणी उपाशी.

पिंजून होतोय वार्ड 
गल्यापण सुटत नाही,
निवडणूक झाल्यावर नेता 
कुणालाच दिसत नाही.

कधी वाटतोय नोटा 
कधी वाटतोय साडी,
नेता आपल्या जनतेची
अचूक पकडतो नाडी.

मोठे- मोठे दावे 
अन आश्वासनांची खैरात,
विजयी झाल्यावर मग 
संपूर्ण गावभर वरात.

जाती-धर्माचे दाखले 
देऊन ठेवतो अचूक बोट,
धर्मनिरपेक्ष आम्ही मग 
देतो जातीवर वोट.

निवडून आल्यावर मग
वाढतो यांचा भाव,
मग हा आमच्या बापाला 
पण विचारात नाही राव.

कसली आली जनता 
अन कसली आली सेवा,
5 वर्षात हा 
खातो मेवाच- मेवा.

आम्ही विकतो मुटभर 
पैश्यासाठी आपले इमान,
मग हाच नेता आमच्या मानगुटीवर 
बसून उडवितो आपले विमान.

5 वर्षात सारा गावच काय 
देशाला पण लुटून होतो मोकळा,
पुन्हा पुढच्या निवडणुकीत पैसे देऊन 
वोट मागायला मोकळा.

- अनिकेत भांदककर.

30 March, 2014

स्वतःला जपण्यासाठी तरी


गारठलेली ती रात्र 
आणी त्या रात्रीचा एकांतवास 
वाऱ्याची एक झुळूक हळूच आली 
आणी तिची आठवण तीव्र करून गेली 
मनामध्ये असंख्य विचारांचे 
वादळ उठवून गेली...

का मला इतकी आठवते ती ..?
सतत माझ्या मनामध्ये येऊन छळते मला 
आता ह्या छळन्याने 
जखम पण होऊ लागलीय 
आणी या जखमेवर उपाय काय..?

उपाय म्हणून 
काढून टाकलंय तिला डोक्यातून 
पण, हृदयातून कसं काढणार?
आणी जर हृदयच 
काढून टाकायचं म्हटलं तर ..?

कदाचित हृदय टाकेलही काढून 
पण मग त्या हृदयाला 
कोण जपणार..?
आणी त्या हृदयातली ती..?
तिची काळजी कोण घेणार..?

ह्या हृदयाला तिने 
स्वतःत सामावून घ्यावं 
निदान स्वतःला जपण्यासाठी तरी.

18 March, 2014

प्रेमभंग

स्वर्गातील अप्सरेशी
प्रेमभंग माझा झालाय
हृदय तर तुटलं आधीच
जीव देखील ओठापर्यंत आलाय

अंगात नाही शक्ती
नाही कुणाची भक्ती
माझ्यावरच का अशी
प्रेमभंगाची सक्ती

फुटकं नशीब घेऊन आलोय
कि आल्यावर नशीब फुटलं
प्रेमभंगाच्या विरहात
सारकाही सुटलं

तिचा एक- एक अश्रू
मोत्यासारखा जपतोय
जनावरांच्या या गर्दीत
फक्त मीच खपतोय

किंमत नाही देहाला
किडनी विकून बघतोय
पाण्याने तहान भागात नाही
म्हणून, अश्रू पिऊन बघतोय

सापडत नाही आहे मला
जगण्याची वाट
जीवन संपविण्याचा
आता घालतोय घाट

शेवटची हि रात्र आणी
मग कायमची झोप
तिच्या परतण्याची आता
उरलीच नाही होप

प्रेमभंगाचे हे दुखः
दुखःचे हे अश्रू
वेळ भरली आता
तिरडीवर निवांत पसरू

धडधडतय हृदय
फुललीय छाती
जाळून जाईल देह
उरेल फक्त माती

जिंकुनाही शकलो तिला
याची खंत झाली
माझी प्रेमयात्रा
इथेच अंत झाली.

02 March, 2014

एकाकी अंत

विचारांच्या या जगात
मला कुणीतरी आठवलय 
जिने प्रेमाच्या या खेळत 
मला नरकात पाठवलंय

चांदण्या रात्रीच्या गारव्यात 
चेहरा तिचा दिसला 
त्याच क्षणी मनामध्ये 
प्रेमाचा पहिला अंकुर फुटला 

धडधडणारं हृदय मग 
बाहेर येईल कि काय असं वाटलं 
तिच्याच आठवणीने माझं
संपूर्ण हृदय दाटलं
मग तिच्यासाठीच जगावं कि मरावं
असा वाटलं

तिचं ते अलगद हसणं
आणि गालावरची खळी
तिचा चेहरा बघतच 
दुखः माझे सैरावैरा पळी

काश, स्वीकारलं असत
तिनी माझ्या प्रेमाला 
तर कदाचीत तिच्यासाठी 
जुंपलो असतो मी घाण्याला 

हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर 
आयुष्य कमी कमी होत चाललंय
आता तिच्या जुन्या आठवणींच्या 
सावल्यांनी दाटलय 

हृदय भरून आलंय
भावना हि लागल्या वहायला
ती थांबली पण नाही 
माझी हि अवस्था पाहायला 

चिंब भिजलेल्या डोळ्यातुनी 
अलगद वाट काढतील अश्रू 
ह्या अश्रूंची किमत ठरवत
केवढ्याला हे विसरू 

सूर्य निघाला मावळतीकडे 
आणि फुलेही लागली गळायला 
श्वास हि आता 
फुफ्फुस सोडून लागलाय पाळायला 

दिव्याची ज्योत देखील 
लागलीय आता फडफडायला 
संपलं त्यातील तेल आता 
उरली फक्त वात जाळायला 

जाळून जाईल वात आणी
सर्वत्र अंधार होईल 
कुणावर तरी प्रेम करण्याचा 
हा एकाकी अंत होईल.