(जिवनात काही गोष्टी करायच्या राहुन जातात)
पडत होता पाउस
पण भिजायचे राहून गेले,
कुशीत होतो आईच्या
पण निजायचे राहुन गेले.
वाजत होता ढोल
पण नाचायचे राहुन गेले,
ऐकत होतो जोक्स
पण हसायचे राहुन गेले.
जळत होतं मन
पण विझवायचे राहुन गेले,
फाटलं होतं काळीज
पण शिवायचे राहुन गेले.
समोर होती ती
पण बघायचे राहुन गेले,
सोबत होते मित्र
पण जगायचे राहुन गेले.
© अनिकेत भांदककर.