Showing posts with label सहज सुचलं म्हणून. Show all posts
Showing posts with label सहज सुचलं म्हणून. Show all posts

04 June, 2017

वाटण्यातला आनंद (हृदयस्पर्शी कथा)

कालच मित्राला त्याच्या जीवनातील पहिला पगार मिळाला, म्हणाला, "कपडे घायला जाऊया". खूप दिवसापासून दोन जोडी कपड्यावर काम भागवित होता तो. ब्रँडेड कपडे घ्यायचे होते त्याला. कपड्याच्या शोरूम मध्ये ब्रँडेड कपडे बघतांनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. थोड्या वेळाने म्हणाला, "चल दुसरीकडे बघुया".

काय झाले काहीच कळले नाही. मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. साध्या दुकानात. आता तो लोकल कपडे बघू लागला. विचारले काय झाले तर काहीच बोलला नाही. तिथून कपडे घेऊन आम्ही बाहेर पडलो. म्हणाला, "जवळपास दोन हजार वाचलेत".

मला आश्चर्यच वाटलं, कालच पगार झाला, पगारही चांगला, पहिल्या पगारात ब्रँडेड कपडे घेईल म्हणून हा इतके दिवस जीव लावून बसला होता, आणि आता काय झालं अचानक असं.?

22 July, 2016

जाऊदे रे...

'जाऊ दे रे...' हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. काही झालं कि 'जाऊ दे' म्हणून सोडून द्यायची कला एव्हाना आपण चांगलीच अवगत केली आहे. एखाद्या सिग्नलवर मामूनी (ट्राफिकवाल्या) पकडलं कि जाऊ द्याना हो म्हणत हिरवी पत्ती सरकविली कि काम होऊन जाते. एखाद्या बलात्काराची घटना घडते तेव्हा, त्या नराधमांना जनतेच्या हवाली करण्याची मागणी करणारा एखादा, देशात न्याय व्यवस्था शाबूत असून त्या आरोपींना फाशीच होईल असे म्हणणारा दुसरा तर 'जाऊदे ना यार' आपण काय इथे नुसते तोंडचे फटाके फोडल्याने काम होणार आहे का असं म्हणणारा तिसरा व्यक्ती सापडतोच.

01 January, 2015

नव्या उमेदीने आयुष्य जगा


आयुष्याच्या कित्येक टप्यावर
संकटं आडवी येणारच,
तेव्हा हरून जाऊन
मैदान सोडायचं नसतं
तर त्या संकटाचा
सामना करायचा असतो.
रात्रीनंतर दिवस येतो
दुःखामागून सुखं येतात
तसच वर्षामागून वर्ष येतात,जातात.
तेव्हा नव वर्षाच स्वागत
नव्या आयुष्यप्रमाणे करा,
झालं- गेलं सर्व विसरून
नव्या उमेदीने आयुष्य जगा.

Happy New Year- 2015

22 October, 2014

लोकसभेतील 10 सुंदर स्त्री खासदार

महिला म्हटल्या कि सुंदरता, त्याचं देखणं रूप आलंच. मग त्या महिला चित्रपटश्रुष्टीतल्या असो, खेळातल्या असो नाहीतर राजकारणातील असो. त्यांच्या सौंदर्याची तारीफ आणी चर्चा होतच असते. आणी याला आपल्या राजकारणातील महिला देखील अपवाद नाही. आज आपण इथे पाहणार आहो 16 व्या म्हणजेच सध्याच्या लोकसभेतील महिला खासदार आणी त्यांचा सौंदर्यानुसार लागणारा क्रमांक. आपण आघाडीच्या 10 महिला येथे विचारात घेणार आहो.


(सूचना- येथे केवळ '16 व्या लोकसभे'च्याच महिला खासदारांचा विचार करण्यात आला आहे.)

10- सुप्रिया सुळे 

महारष्ट्रातील मातब्बर नेते आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या 2009 मध्ये सुधा येथूनच लोकसभेवर गेल्या होत्या. त्याआधी त्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांचा या यादीत 10 वा क्रमांक लागतो.

9- पुनम महाजन 

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पूनम ह्या कन्या आहे. त्या उत्तर मध्य मुंबईचे प्रतिनिधित्व करतात. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांची हि पहिलीच लोकसभा वारी (टर्म ) असून 2014 च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा त्यांनी 1.86 लाख मतांनी पराभव केला होता.




8- हरसिम्रत  कौर बादल

हरसिम्रात कौर बादल या शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवार असून त्या पंजाब मधील भटिंडा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या त्या केंद्रात अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा या यादीत आठवा क्रमांक लागतो.


05 October, 2014

विरह

वेळ सायंकाळची होती. सूर्य क्षितिजापल्याड झेपाविण्याच्या तयारीत होता. पक्षांचा थवा परतीच्या वाटेवर निघाला होता. निरव शांततेच्या ह्या वातावरणात सूर्य क्षितिजावरून लाल, पिवळ्या, भगव्या रंगाची मुक्त उधळण करीत होता. गार वाऱ्याची झुळूक हळुवार इकडून तिकडे बागडत होती. परंतु पायल- राघवच्या प्रेमाने वातावरण उबदार झाले होते.

पायलच्या नाजुक सिंहकटी कंबरेवर अलगद दोन्ही हात ठेवत राघवने तिला आपल्या जवळ ओढले. हळुवार मागून तिला मिठी मारून आपले दोन्ही हात तिच्या पोटाभोवती गुंडाळून तिला आपल्या उबदार मिठीत घेतले. आपली हनवटी तिच्या खांद्यावर ठेवली. आता तो तिच्या केसांचा सुगंध अलगद टिपू शकत होता व ती त्याचा श्वासोच्छवास सहज जाणवू शकत होती.

तिच्या शांत असण्यात गोंधळाचा विरोधाभास होता. डोक्यात विचारांचा डोंब मजला होता परंतु त्यांना ओठावर येण्यास जणू मनाई होती. तिची नजर थेट क्षितिजाला भिडली होती आणी ते क्षितीज तिला तिच्या प्रेमाची आठवण करून देत होते. त्याने केलेल्या रंगाची उधळण जणू तिला जळवीन्यासाठीच होती. एव्हाना तो सोबत असताना सतत बडबडणारी ती आज शांत राहूनच व्यक्त होत होती.

29 September, 2014

चेतन भगत- हाफ गर्लफ्रेंडच्या निमित्याने

हाफ गर्लफ्रेंड' हे चेतन भगतच सातवं बुक आणी सहावं नॉवेल. आधीची पाचही नॉवेल चांगलीच गाजली. इतकी कि त्यातल्या पहिल्या चार नॉवेलवर चित्रपट बनले आहे आणी उर्वरित एका  नॉवेलचे चित्रपटासाठी कॉपीराईट्स विकल्या गेले आहे. चेतन भगत हे एक लेखक म्हणून युवकात चांगलेच लोकप्रिय झाले आहे. इतके कि काही दिवसापूर्वी चेतनने आपले नवीन नॉवेल 'हाफ गर्लफ्रेंड' लवकरच पब्लिश होत आहे असे जाहीर केले आणी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या वेबसाईटवर इतकी गर्दी केली कि त्याची वेबसाईटच क्राश झाली.

सद्या युवकांमध्ये नॉवेल वाचनाची भयंकर क्रेझ आहे. त्यातल्यात्यात फिक्शन तर सर्वात आघाडीवर. कितीही फेसबुक, व्हाट्सअप किवा स्मार्टफोन येउदे परंतु पुस्तक (Hard Copy) वाचण्याची क्रेझ काही कमी होणार नाही. एकीकडे भारतीय तरुण वाचन संस्कृती विसरत चालले आहे असे म्हणताना दुसरीकडे हेच तरुण चेतन भगत, रविंदर सिंग, अमिष त्रिपाठी, दुर्जोय दत्त ई. तरुण लेखकांच्या कादंबऱ्या डोक्यावर घेतांना दिसतात. दिवसरात्र वाचून त्याचा फडश्या पाडतात. त्यासंबंधी आपल्या ब्लॉगवर किवा सोशल नेटवर्किंग साईटवर रिव्हिव लिहितात. दुर्दैवाने यात मराठी लेखक कुठेच दिसत नाही. मराठी तरुण लेखकांनीसुधा आता इंग्रजीत कादंबरी लिहायची गरज आहे. सुदीप नगरकर या मराठी तरुण लेखकाचं 'फिव थिंग्स लेफ्ट अन्सेड' (Few Things Left Unsaid) हे  इंग्रजी नॉवेल गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी गाजलं.

16 September, 2014

इतर लोक आपल्याला तेवढंच समजतील जेवढी त्यांची आपल्याला समजून घेण्याची लायकी असेल.

खरतर इतरांनी आपल्याला काय समजावे हे आपल्या हातात नसते. त्यांनी आपल्याला काय समजावे यासाठी आपण प्रयत्न करू शकतो परंतु आपल्याप्रती त्यांचा दृष्टीकोन कसा आहे ह्यावर ते आपल्याला काय समजेल व आपल्याशी कसे वागेल हे ठरत असते. नाहीतर तुम्ही बघा ना, आपण एखाद्याशी खूप प्रेमाने, आपुलकीने वागतो तरी त्याच्या वागण्यातील तुसडेपणा काही केल्या कमी होत नाही किवा झालाच तरी तो फक्त समोरासमोर भासविण्यापूर्ती असतो. तेच एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने, आपुलकीने वागत असते परंतु आपल्याला त्या व्यक्तीबद्दल म्हणावा तितका जिव्हाळा वा आपुलकी निर्माण होत नाही.

एकदा हॉटेल मध्ये काही मित्रांसोबत चहा पित बसलो होतो. गप्पांचा फड रंगला होता. तेवढ्यात बाजूच्या टेबलावरील एक गृहस्थ वेटरच्या नावाने ओरडायला सुरुवात करतो. वेटर लवकर डिलिवरी देत नाही म्हणून तो गृहस्थ त्याला खूप शिव्या देत होता. पण वेटर त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता शांतपणे ते सर्व ऐकून घेत होता. काही वेळाने तो गृहस्थ तावातावाने उघून जातो व वेटर आपल्या कामी लागतो. नंतर जेव्हा वेटर आमच्या टेबलापाशी आला तेव्हा त्याने नेहमी प्रमाणे अगदी स्मितहास्य करून आमची ऑर्डर स्वीकारली. त्याच्या ह्या प्रसन्न रुपाकडे पाहून आम्ही चाट पडलो. मनोजने त्याला विचारले कि एवढा अपमान झाल्यावर सुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य आणी इतक्या शांतपणे तुम्ही कसं काय काम करू शकता...???

14 September, 2014

स्व मोटिवेशन

'इतर कुणी आपल्याला जास्तवेळ मोटिवेट करू शकत नाही त्यामुळे मनुष्याने स्व मोटिवेट असावे' अश्या प्रकारचं एक वाक्य वाचनात आलं होत आणी खरच आहे ते. कधीतरी आपणा कुठ्ल्याश्या मोटिवेश्नल सेमिनारला जातो. सेमिनार ऐकतो, खूप प्रेरित होतो आणी त्याच प्रेरणेने बाहेर पडतो. डोक्यात विचारचक्र सुरु असत कि बस, आता आपणपण अगदी असच करायचं. काय तर आपणा आपले वेळापत्रक बदलावितो, उठण्याची वेळ, काम करण्याची पद्धत, अडचणीला सामोरे जाण्याचा दृष्टीकोन ई. हे नेमाने 3-4 दिवस चालते. मग रोजच्या धावपळीच्या कार्यक्रमात ह्या गोष्टी मागे पडतात आणी काही दिवसांनी आपण तीच अनउत्साही जिंदगी जगात असतो. उत्साह कमी किवा संपलेला असते. मग पुढच्या मोटिवेश्नल सेमिनारला जात पर्यंत आपली स्थिती काही सुधरत नाही.

आजच्या धावपळीच्या जीवनात रोजची सकाळ हि प्रेरणादायी असेलच असे नाही. एखादी पहाट तशी उजडलीच तरी इतर ताण तणाव तो उत्साह मारून टाकतात. म्हणून आपल्यासमोर उत्साही जीवन जगण्यासाठी एकच उपाय उरतो तो म्हणजे 'स्व मोटिवेषण'.

मनुष्य कुठेही, केव्हाही आणी कुणाकडूनही मोटिवेट होऊ शकतो. खरतर मोटिवेट होणे हे काही रॉकेट सायन्स नाही. याचे कुठलेच मापदंड नाही. कारण कुठलीशी एखादी छोटीशी गोष्ट मनुष्याला मोटिवेट करेल ते सांगता येत नाही. एक लहानशी मुंगी आपल्या वजनाच्या दसपट वजन उचलते हि गोष्ट एखाद्याला मोटिवेट करते तर एखाद्या लहानश्या बाळाचे हसणे-खिदळणे त्याच्या आईला मोटिवेट करते तर एखाद्याला आपली गरिबी आणी अपयश यातून प्रेरणा आणी जिद्द मिळते आणी तो पुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो. मोटिवेषण मिळण्याकरिता गरज असते ती डोळे, कान उघडे ठेवण्याची आणी त्यामागची प्रेरणा/ उद्देश समजून घेण्याची. त्याच प्रमाणे आपण स्वेट मार्डेन, पाउलो कोएल्हो, रोबिन शर्मा, शिव खेरा यांची पुस्तक वाचून आणी सिक्रेट सारखा व्हिडीओ पाहून स्वतःला मोटिवेट करू शकतो. 

21 July, 2014

सुखावणारा पाऊस

या वर्षी पाऊस कमी पडणार असं हवामान खात्याने सुरुवातीलाच सांगितलेलं. उन्हाळाही चांगलाच कडक होता. जुलै महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाचा राज्यात पत्ता नाही (मुंबईत मधात जो काही बरसला तेवढाच). खरतर उन्हाळ्याच्या गर्मीने असह्य झालेल्या सर्व सजीवांना पावसाने नवसंजीवनी मिळते. ओसाड आणी कुरूप झालेलं जंगल पावसाने कसं हिरवागार आणी सुंदर दिसतं. जगाचा पोशिंदाही पावसाने खुश होतो. वातावरणात गारवा येतो. प्रेमयुगुलांसाठी तर ही पर्वणीच असते. जणू काही त्यांच्या साक्षीने पाऊसच प्रेमाची उधळण करीत असतो. असा हा पाऊस.

पाऊस नाही बरसला तर जशी ओरड होते तशीच तो जास्त बरसला तरी देखील ओरड होते, नुकसान होते. परंतु अर्धाअधिक जुलै निघून गेला तरी पावसाचा काही पत्ता नाही त्यामुळे त्याच्या नावाने खडे फोडणे सुरु झाले होते. मागच्या वर्षी पावसाने कहरच केला होता. यंदा पाऊस कमी पडून कहर करतो कि काय असं वाटायला लागलं होत. पण शनिवारच्या रात्रीने ती भीती दूर केली. निदान पूर्व विदर्भवाल्यांची तरी. 

शनिवार रात्रीपासून जे त्याने बरसायला सुरुवात केली ते हा लेख लिहितपर्यंत (सोमवार सायंकाळपर्यंत) तरी बरसणे थांबविले नव्हते. पाऊस जोराचा नसला तरी रिमझिम - रिमझिम दिवसभर सुरु होता. त्यामुळे सारा परिसर हिरवी चादर ओढल्यासारखा भासत होता. नद्या पण चांगल्याच दुथड्या भरून वाहु लागल्या आहे. छत्र्या- रेनकोट घालून लोक बाहेर पडायला लागली आहे. जोगोजागी पकोडे व बुट्टI चे ठेले ग्राहकाने वेढलेले दिसायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर आणी कडेला पाण्याची डबकी साचू लागली आहे.

हा पाऊस नक्कीच सुखावणारा आहे. पण तो पर्यंतच जो पर्यंत तो एका मर्यादेपर्यंत बरसेल. त्यानंतर तो दुखावणारा असेल.

04 July, 2014

फुटबॉलचा ज्वर

जसजशे फुटबॉल चे सामने पार पडत आहे तसतसा फुटबॉलचा ज्वर वाढत चालला आहे. नुकतीच दुसरी फेरी पार पडली. पहिल्या फेरीतील 32 पैकी फक्त 16 च संघ या दुसऱ्या फेरीत पोहोचतात. व आता 16 पैकी फक्त 8 च संघ उपात्यापुर्व फेरीसाठी पात्र ठरले आहे. आता त्यांच्यातील पुढील घमासान 4 जुलै ते 14 जुलै च्या पहाटे पर्यंत (भारतीय वेळेनुसार) चालणार आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ अशी बुरुदावली मिळविनारा फुटबॉल हा खेळ जगातील 190 पेक्षा जास्त देशात (काही देशात कमी प्रमाणात का असेना )खेळला जातो. FIFA या फुटबॉल च्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे तर तब्बल 209 संघ प्रतिनिधी आहे. यावरून फुटबॉल खेळणार्यांचा अंदाज येईल. आणी त्यातल्या त्यात या वेळेचा विश्वचषक होतोय ब्राझील या फुटबॉल वेड्या देशात. जसे भारतात क्रिकेट तसेच ब्राझीलमध्ये फुटबॉल हा धर्म आहे. आणी जसा क्रिकेटमधील देव म्हणजे सचिन तसच फुटबॉल मधील देव म्हणजे 'पेले' हा देखील ब्राझीलचाच. 

31 May, 2014

मोदी शतक ठोकतील का हेच आता पहायचे आहे

बुरसटलेल्या आणी उदासवाण्या विचाराने जेव्हा एखादी खेळी सुरु होते आणी वेळामागून वेळ निघून जाते तरीसुद्धा उत्साहाचा वा उत्कर्षाचा लवलेशही जिथे दिसत नाही तिथे प्रवाहाच्या बाजूला होऊन थोड वेगळं करू पाहणाऱ्याचं कौतुक होत असत. आणी जर का त्यात त्याला यश आलंच तर मग जनता त्याला समाजाचा उधराकर्ता म्हणून मिरवायलाही मागे-पुढे पाहत नसते.

समाजाचा उधार करायचाय म्हणून धोरणं आखायची, त्याला आपल्याच कुटुंबातील लोकांची नावे द्यायची, ती धोरणं राबवण्यासाठी सामान्य जनतेच्या करापोटी आलेल्या पैश्याची तरतूद करायची आणी गरिबांची सहानुभूती पदरात पाडुन गरिबांचे आणी दुर्लक्षितांचे कसे आपणच कैवारी आहो या थाटात मिरवायचे. एकदा का योजना लागू झाली कि मग तिच्याकडे ढुंकूनही पहायचे नाही. (प्रचंड खर्च करून राबविण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा योजनेचे आताच 12 वाजल्याचे ठोके ऐकू येऊ लागले आहे) आपल्याच पक्षातील नेते, लोक आणी तथाकथित सरकारी अधिकारी/ कर्मचारी त्या योजनेचा बट्याबोळ करतील तरी मग त्यात नाक खुपसायचे नाही आणी मग नंतर कधीतरी भाषणात आवर्जून सांगायचे कि गरिबांवर खर्च होणाऱ्या 100/- रुपयातील फक्त 2/- रुपये  त्यांच्यापर्यंत पोहोचतात म्हणून. याला काय म्हणायचे? भ्रष्टाचाराला समर्थन कि सरकारचा (आता भूतपूर्व) नाकर्तेपणा?

हाच नाकर्तेपणा भोवला, भारतीय जनतेला गृहीत धरणार्यांना जनतेनी क्लीन स्वीप दिली. त्यांनी 'डंके कि चोट पर' छाती ठोकून सांगितलं कि तुम्ही आम्हाला अडाणी समजत असाल आणी सहानभूती द्वारे आमचे वोट मिळवत असाल तर याद राखा! विरोधी बाकावर बसण्याची पण लायकी ठेवणार नाही आम्ही तुमची.

खर तर हे फार पूर्वीच घडायला पाहिजे होत पण तेव्हा जनतेला तडजोड करण्यावाचून काही पर्याय नव्हता. पण आता लोकांना मोदीच्या रूपाने सक्षम पर्याय मिळाला आहे. मोदी च्या भाजपाला एकहाती सत्ता देऊन, यापुढे पिचलेल्यांना सत्ता मिळणार नाही असा संदेश जनतेने दिला आहे. पण मोदींना एकहाती सत्ता दिली म्हणजे असं नाही कि त्यांनी काहीही केलं अथवा काहीच नाही केलं तरी चालेल. फक्त जनतेने चाबूक दुसऱ्याच्या हातात दिला आहे ह्या देशाचा गाडा हाकणासाठी. जनतेने एक विश्वास दाखवला आहे मोदींवर आणी त्या विश्वासावर खर उतरण्याची आता जबाबदारी मोदी आणी टीमची आहे.

याचीच प्रचीती देत मोदींनी आपला दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. दर चार महिन्यात सुरु होणाऱ्या एका नवीन योजनेला आणी तिच्या नावाला कांटाळलेल्या लोकांनी मोदींच्या या 10 कलमी कार्यक्रमाकडे जातीने लक्ष नाही ठेवले तर नवलंच. कारण एखाद्या घोषणेच्या अंबलबजावणीपासून तर तिची पुर्ती वाट लागतपर्यंतचा प्रवास जनतेला नवीन राहिलेला नाही. त्यामुळे या 10 कलमी कार्यक्रमाची आणी भविष्यात घेतलेल्या निर्णय/ योजनेची यशस्वीरीत्या जर अंबलबजावणी झाली नाही तर जनता पुढच्या निवडणुकीत सध्याच्या सरकारचेसुधा पानिपत करेल यात शंका नाही. त्यामुळे मोदींनी सुरु केलेली ही नवीन राजकीय खेळी जनतेचा कौल आणी त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता शतक ठोकेल का हेच आता जनतेला बघायचे आहे.

30 May, 2014

झुळूक

आजच्या इंटरनेटच्या, स्मार्ट फोनच्या, अंड्रोईड इ. च्या हायटेक जगात 'झुळूक' या शब्दाबद्दल देखील नुकत्याच तारुण्यात आलेल्या वा नुकत्याच मिसरूड फुटलेल्या युवकाला माहिती असेलच असे वाटत नाही. इतर ओल्डएज गोष्टीसारखा हा शब्द आणी त्याचा अनुभव देखील कालबाह्य होत चालला आहे.  चार भिंतीच्या आत मिशनवाले गेम्स, फेसबुक, ट्वीटर, WatsApp किवा वेब कॅमेरावर मित्र- मैत्रिणींशी गप्पा करत ज्यांचा दिवस जातो त्यांचा या 'झुळूक' नावाच्या गोष्टीशी तरी कसा संबंध येणार? असो.

झलुकेवर लिहिण्याच कारण एवढच कि कालच माझा तिच्याशी संबंध आला. एव्हाना वाऱ्याची झुळूक म्हटली कि आठवतो तो पावसाळा आणी हिवाळापण. मस्त जोरदार पाऊस पडल्यावर वातावरण कसं थंड होत. एक हलकीशी वाऱ्याची झुळूक आधीच प्रफ्फुलीत झालेलं मन आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवते. वातावरण कसं अगदी टिपिकल रोम्यांटीक होऊन जातं . झुळूकेबरोबर आलेला गारठा मन आणी शरीर, दोनीही शाहारवून टाकतो. पण मला काल मिळालेल्या उबदार झुळूकेचा अनुभव गर्मीत आनंद देणारा होता. 

महाराष्ट्रातलं आणी सद्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच उष्ण शहर म्हणजे चंद्रपूर. सूर्याचं आग ओकनं काय असते हे खरच ज्याला अनुभवायचं आहे त्याने या दिवसात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीच चंद्रपुरात येऊन राहावं. आणी A /C  खोलीत बसून चंद्रपूरच्या उष्णतेवर नुसता शाब्दिक कीस पडणाऱ्यांनी तर खरच एकदा डेरिंग करावं मे महिन्याच्या अखेरीच एक हफ्ता चंद्रपुरात काढण्याचा. खर सांगतो, 'टाके ढिले होणं' ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ कळेल तुम्हाला. आणी त्यातल्या त्यात जर लाईट गेली तर मग देव पाण्यात ठेवण्यावाचून दुसरा पर्याय नाही. भट्टीत बसल्यावर कसं वाटतं याचा अनुभव घ्याल तुम्ही.

काल तसच घडलं. दुपारी 3 वाजताच तापमान 46.6 डिग्री. से. होतं. (AccuWeather वरून मी इतक्यात रोज दुपारी तापमान बघत असतो म्हणून माहीत झालं होत). रात्री 9 च्या सुमारास लाईट गेली. नुकतच जेवण झालं होत. एव्हाना केव्हाही लाईट गेली कि लवकर येते. लोड शेडींग पण नाही आहे. कारण वर सांगितलेलंच आहे. आणी भारतातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्रपण इथेच, त्यामुळे बरीच ओरड होते लोड शेडींग राहिली की. विषयांतर झालंच वाटते. माफ करा.

तर, रात्री 9 च्या सुमारास लाईट गेली तर वाटलं येईल 5-10 मिनिटात. पण अर्धा तास झाला तरी लाईट येण्याच नावच नाही. आता मात्र खरच भट्टीत बसल्यासारखं वाटत होत. त्या वेळेच तापमान 40-38 डिग्री. से. च्या तर नक्कीच कमी नव्हतं.  आता मात्र पाणी नाकाच्या वर जायला लागलं होत. घरचे सगळे त्रासले. मी चक्क घामाने डबडबलो होतो. घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या. जीव कासावीस होत होता. एवढ्या गर्मीत शांत बसने देखील मुश्कील होऊन जाते तिथे झोपणे किव्हा एखादे काम करणे तर अशक्यच आहे. आता लाईनमन आणी MSEB च्या नावाने खडे फोडण सुरु झालं होत. मी बाहेर वऱ्हांड्यात खुची टाकून बसलो पण बाहेर वारा नसल्याने तिथे सुधा उकडत होत. घाम पुसून- पुसून देखील किती पुसणार? एवढ्या उकाड्यात AC/ कूलर शिवाय काहीच पर्याय नसतो. आम्हा चंद्रपूरकरांना तर नाहीच नाही. 

लाईन जाऊन तासभर होऊन गेले तरी लाईट यायचा काही पत्ता नाही. तेव्हा अचानक वाऱ्याची हलकीशी झुळूक आली. गरम झुळूक. आणी माझ्या ओल्याचिंब शरीराला गारवा देऊन गेली. शहारे पण आले अंगावर. काय सांगू तुम्हाला, किता सुखद अनुभव होता तो! तहानलेल्याला पेलाभर थंडगार लस्सी किवा पाणी मिळाल्यावर कसं वाटतं अगदी तसाच अनुभव. जाम हायसं वाटलं त्या वाऱ्याच्या झुळुकेने. नकळतच वाऱ्याचे आभार मानले. त्यानंतरचा एक तास या वाऱ्याच्या झुळुकेनेच तारलं मला. एवढा सुखद आनंद होता तो कि पुन्हा एकदा ह्या झुळूकेचे महत्वं पटले.

जीवनात अश्या छोट्या- छोट्या गोष्टीने देखील किती आनंद मिळतो मनुष्याला. फक्त ती वेळ आणी तो क्षण महत्वाचा असतो. निसर्गापेक्षा जास्त चांगले आणी आश्चर्यकारक सरप्राईज अजून कोण देऊ शकतो मनुष्याला?  रडवतोही तोच आणी हसवतोही तोच. तोच घेतो  आणी तोच देतो योग्य वेळ आल्यावर. बाप आहे तो सर्वांचा.

Image Credit- Gettyimages.com

10 March, 2014

मनासारखं जगा

दिवसभर राब-राब राबतो आपण, सकाळी उठलं कि कालची अतृप्त इच्छा आणी उद्याची स्वप्न काळीज शांत होऊ देतच नाही. जरा कुठे विसावा घेतलाच तर मागचा पुढे निघून तर जात नाही आहे ना याकडे सार लक्ष. थांबायची वेळ येते तेव्हा धावत असतो व धावायची वेळ आल्यावर थकलेलो असतो आणि मग चिडत गुरफटत स्वतःच्याच नशिबाला दोष देत बसतो आपण.
म्हणून एक करायचं, प्रत्येक गोष्टीत काहीतरी आनंद देणारं असत , त्याचा मनसोक्त आनंद लुटायचा, थोडा विसावा घ्यायचा, दिवसभरातला एखादा क्षण मनासारखा जगायचा, आवडती गोष्ट करून बघायची, दिवसभर केलेल्या धावपळीतून आनंद वेचायचा, असा आनंद जो तुटलेली स्वप्न आणी अतृप्त इच्छेवर मात करायला पुरेसा असेल.

- अनिकेत भांदककर.

01 January, 2014

आयुष्य

आयुष्य फक्त एकदाच मिळतं. दुसरा क्षण येतो तेव्हा पहिला क्षण निघून जातो, तो क्षण कसा जगायचा हे आपल्या हातात असतं. येणारा क्षण हा जातोच,  मग तो दुखःत घालवा किवा आनंदात.
प्रत्येक क्षण हि एक संधी असते आणी प्रत्येक संधीत असते एक आशा, स्वप्न पूर्ण करण्याची. प्रत्येक चांगला- वाईट क्षण मिळून माळ बनत असते आणी ती माळ म्हणजेच जीवन. जे क्षण आनंदाने जगलेले असतात ते मोती बनतात आणी इतर बनतात दगड पण मोत्यांचा अहंकार बाळगायचा नसतो आणी दगडांचा तिरस्कार करायचा नसतो. जिथे मोती उपयोगी पडत नाही तिथे दगड उपयोगी येतो. दुखःने घालविलेल्या क्षणाचा उपयोग  सुख वेचण्यासाठी करायचा असतो आणी सुखः - दुखःचा समतोल साधत जीवन जगायचे असते.


- अनिकेत भांदककर.

31 December, 2013

प्रत्येक दिवसाचं स्वागत 1 जानेवारी सारखं करायचं.


सरत्या वर्षाला निरोप आणी नवीन वर्षाच स्वागत धूम - धडाक्यात करण्यात मग्न असतील सार जग. जो जितक्या वर्षाचा त्याने तितक्या वेळेस केलं असणारच असा निरोप आणी स्वागताचा समारोह. नवीन वर्षाच स्वागत तर आपण जोशात करतो पण त्या नंतरच्या दिवसांच काय? 2 तारखेपासून आपली दररोजची धावपळीची आणी ताणताणावयुक्त Life सुरु होते.

ज्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी पासून होते त्याच प्रमाणे नवीन दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होते. उजाडणारा नवीन दिवस हा नवीन वर्षाप्रमाणेच एक नवीन सुरुवात घेऊन येतो. काल झालेल्या चुका आणी ताण - तणाव बाजूला सारून उत्साहाने, उमेदीने एक नवीन आशावादी सुरुवात करायची
असते नव्या दिवसाची. मग बघा प्रत्येक दिवस कसा नवीन वर्षाप्रमाणे वाटायला लागतो ते.

खर तर येणारे नवीन वर्ष हे फक्त तारखांचे खेळ आहेत. 31 decembar हि तारीख गेली कि 1 जानेवारी हि तारीख येते परंतू आयुष्याची झालेली 1 जानेवारी (सुरुवात) हि वर्षानुवर्षे अविरत चालूच असते आणी ती फक्त एकदाच 31 decembar (शेवट/मरण) ह्या टप्यावर येते. तेव्हा पुन्हा येणाऱ्या आयुष्याच्या 1 जानेवारीच स्वागत करायचा काही chance च नसतो आणि नसते नवीन कुठली अशा, सुरुवात, संकल्प पुन्हा 1 जानेवारीला करण्यासाठी. कारण तेव्हा 31 decembar ची पार्टी झाली कि कायमचीच पार्टी होते आणि एकदा झालेली रात्र मग कायमचीच रात्र होते.

 म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या वर्षाप्रमाणेच करायला पाहिजे. जीवन तर एकदाच मिळते पण त्याची सुरुवात रोज होत असते. आणि त्या प्रत्येक सुरूवातीच स्वागत 1 जानेवारी सारख करायचं असते.

Happy New Year and New Day to All My Dear Friends.

- अनिकेत भांदककर