‘हाफ गर्लफ्रेंड' हे चेतन भगतच सातवं बुक आणी सहावं नॉवेल.
आधीची पाचही नॉवेल चांगलीच गाजली. इतकी कि त्यातल्या पहिल्या
चार नॉवेलवर चित्रपट बनले आहे आणी उर्वरित एका
नॉवेलचे चित्रपटासाठी कॉपीराईट्स विकल्या गेले आहे. चेतन
भगत हे एक लेखक म्हणून युवकात चांगलेच लोकप्रिय झाले आहे. इतके कि काही दिवसापूर्वी
चेतनने आपले नवीन नॉवेल 'हाफ गर्लफ्रेंड' लवकरच पब्लिश होत आहे असे जाहीर केले आणी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या वेबसाईटवर
इतकी गर्दी केली कि त्याची वेबसाईटच क्राश झाली.
सद्या
युवकांमध्ये नॉवेल वाचनाची भयंकर क्रेझ आहे. त्यातल्यात्यात
फिक्शन तर सर्वात आघाडीवर. कितीही फेसबुक, व्हाट्सअप किवा स्मार्टफोन येउदे परंतु पुस्तक (Hard Copy) वाचण्याची क्रेझ काही कमी होणार नाही. एकीकडे भारतीय
तरुण वाचन संस्कृती विसरत चालले आहे असे म्हणताना दुसरीकडे हेच तरुण चेतन भगत, रविंदर सिंग, अमिष त्रिपाठी, दुर्जोय
दत्त ई. तरुण लेखकांच्या कादंबऱ्या डोक्यावर घेतांना दिसतात.
दिवसरात्र वाचून त्याचा फडश्या पाडतात. त्यासंबंधी आपल्या ब्लॉगवर किवा सोशल नेटवर्किंग
साईटवर रिव्हिव लिहितात. दुर्दैवाने यात मराठी लेखक कुठेच दिसत
नाही. मराठी तरुण लेखकांनीसुधा आता इंग्रजीत कादंबरी लिहायची
गरज आहे. सुदीप नगरकर या मराठी तरुण लेखकाचं 'फिव थिंग्स लेफ्ट अन्सेड' (Few Things Left Unsaid) हे इंग्रजी नॉवेल गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी गाजलं.

