Showing posts with label साहित्य. Show all posts
Showing posts with label साहित्य. Show all posts

14 September, 2019

अनकंट्रोल्ड- भाग 3



दुसरा भाग- येथे वाचा.


घराकडे जात असताना त्याला त्या शायरीच्या ओळी सतत आठवत होत्या. सायंकाळच्या भारी ट्राफिक मधून आपण केव्हा घरी पोहोचलो हे त्याला कळाले सुद्धा नाही. नेहमीप्रमाणे स्वरा आपल्या शाळेतल्या गमती जमती विराटला सांगत होती. पण त्याचे सारे लक्ष ओजस्वीशी झालेल्या बोलण्यातच होते. संपदाशी पण तो काही जास्त बोलत नव्हाता.

"अरे काही झालं का ऑफिस मध्ये आज?" संपादने काळजीने विचारलं.

"नाही गं, काहीच तर नाही" अन्नाचा घास घेत विराटने उत्तर दिले.

"मग तू आज असा इतका गप्प का"

"कुठे गप्प आहो, बोलतोय तरी" संपदाकडे लक्ष न देताच विराटने उत्तर दिले.

"मी विचारतेय तेवढंच उत्तर देतोय तू, काही टेन्शन आहे का ऑफिस मध्ये? फार विचारात दिसतोय."

"नाही गं, त्या प्रोजेक्ट बद्दल विचार करत होतो थोडं" विराटने उत्तर दिलं.

"तू म्हणाला होतास ना कि ऑफिसच टेन्शन घरी नाही आणणार म्हणून?" संपदा थोड्या रागात बोलली.

"बरं चुकलं बाबा, जाऊदे सोड, स्वरा अभ्यास करते कि नाही रोज?" गोष्ट टाळण्याकरिता विराटने विषय बदलावीला.

जेवण झाल्यावर त्याने लॅपटॉप उघडला आणि वेदिका ऑटोबद्दल इंटरनेटवर सर्च करून माहिती घेऊ लागला. पण थोड्याच क्षणात त्याला आज तो ओजस्वीबद्दल जे काही बोलला ते आठवायला लागलं. तिची साहित्याबद्दलची आवड, जाण, इच्छा ई. त्याने लगेच 'निदा फाजली' सर्च केलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल संपूर्ण माहिती वाचून काढली, त्यांच्या काही शायऱ्या वाचल्या. त्याला त्या जास्त कळाल्या नाही पण उत्सुकतेपोटी त्याने वाचून काढल्या. त्याने नंतर इतरही कवी, शायर, लेखक, त्यांच्या कादंबऱ्या यांच्याबद्दल बरीच माहिती वाचली. रात्री उशिरा पर्यंत तो हि सारी माहिती वाचत होता. आता त्याला थोडाफार का असेना साहित्याबद्दल माहित झालं होतं.

10 January, 2016

गुलमोहराच्या कुशीत (चारोळीसंग्रह)


Gulmohar



'गुलमोहराच्या कुशीत' हा माझा दुसरा ई- चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. 'चारोळीगाथा' ह्या पहिल्या ई- चारोळीसंग्रहाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हा दुसरा चारोळीसंग्रह प्रकाशित करण्याचा हुरूप आला. हा चारोळीसंग्रह आपण खाली दिलेल्या 'Download' वर क्लिक करून मोफत डाउनलोड करू शकता.मागील वेळेप्रमाणेच या वेळेस देखील आपण आपला प्रतिसाद मला कळवू शकता. धन्यवाद.


ई- बुक:- गुलमोहराच्या कुशीत (चारोळीसंग्रह)
चारोळीकार:- अनिकेत भांदककर
प्रकाशक:- शब्दझेप
किमत:- मोफत उपलब्ध.

डाउनलोड करा:-  Download (645 kb .pdf file)



                 चारोळीगाथा हा पहिला चारोळीसंग्रह येथून डाउनलोड करा.

19 January, 2015

पोखिला- अपहरणाचे 81 दिवस (पुस्तक परीक्षण)

खरतर अपहरण होणे हे किती भयावह असू शकते आणी त्यातल्या त्यात NDFB (National Democratic Front for Bodoland) सारख्या उग्रवादी संघटनेकडून अपहरण होणे आणी 81 दिवसांनी त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटणे हे एक दिवास्वप्नच असू शकते. आणी हे दिवास्वप्न सत्यात उतरलं आहे त्याचं नाव आहे विलास बर्डेकर. विलास बर्डेकर हे भारतीय वन खात्यात अधिकारी आहे. फुलपाखरावर चालू असलेल्या अभ्यासामुळे आणी फोटोग्राफिच्या आवडीमुळे ते इगलनेस्ट अभयारण्यात जाऊन पोहोचले आणी तिथे त्यांना NDFB तर्फे बंदी बनविण्यात आले.

बंदिवासात असताना आर्मीच्या भीतीमुळे सतत बदलत राहणारे कॅम्प, मैलो-मैल होणारी पायपीट, बेचव जेवण, कुटुंबांबद्दलची लागून राहिलेली चिंता त्याच बरोबर पप्पु, सपन, शंकर, देबू ई. अपहरण कर्त्यातर्फे मिळणारी प्रेमाची वागणूक आणी काळजी ई. विरोधाभासात्मक गोष्टींचे अनुभव बर्डेकरांना आले. त्याचे वरिष्ठ सहकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल इत्यादींनी त्यांच्या सुटकेसाठी चालविलेले प्रयत्न ई. बऱ्याच गोष्टीबद्दल लेखकाला आलेले अनुभव येथे वाचायला मिळतात. एखाद्या चित्रपटातील अपहरणातील थरारनट्याइतके हे अनुभव थरारक नसले तरी खरे अनुभव असल्याने पुस्तकाची उत्सुकता लागुनच राहते.

नौकरीच्या सुरवातीचे काही वर्ष चंद्रपूर, गडचिरोली ई. भागातील जंगलात काढल्याने त्या भागातील जंगलात लेखकाला जे अनुभव आले आणी त्यानंतर आसामच्या ह्या भागातल्या जंगलातील परिस्थिती कळली असता दोन्ही ठिकाणच्या जंगलात, तिथले वन खाते, लाकडाची होणारी तस्करी, नक्षलवाद्यांनी चालविलेल्या चाळवली ई. अनुभव अगदी विरोधी टोकाचे आहे.

27 September, 2014

बुक्ससाठी पिग्गी बँक

पुस्तक वाचायची आवड आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते पण आपल्याला आवडणारी सर्वच पुस्तके आपण घेऊ शकत नाही. एक तर ती फार महाग असतात आणी जरी घेतोच म्हटलं तरी 4-5 थोडी जाडजूड पुस्तकं घेतली कि बजेट एकदम दिड-दोन हजाराच्या घरात चालला जातो. एव्हाना ब्रांडेड शर्ट घेताना कि एखादी ओली पार्टी देताना सहज आपण दोन हजार खर्च करून टाकतो परंतु त्याच किमतीची पुस्तक घायची म्हटली कि मग आपल्यातला पैसे बचतीचा किडा जागा होतो. एवढ्या किमतीची पुस्तक घ्यायला नक्कीच आपल्यापैकी बरेचजण धजावत नाही. 

कपड्यावर किवा ओल्या पार्टीवर खर्च होताना कमीच वाटणारी रक्कम पुस्तकं खरेदी करताना जास्त का वाटत असेल..? का आपण पुस्तक घेताना इतका विचार करतो जितका एखादा शर्ट किवा पार्टी करताना करत नाही. साहजिकच याच उत्तर हेच असेल कि, चांगला शर्ट हि आपली गरज आहे आणी आजच्या जमान्यात थोडी फ्याशन तर करावीच लागते आणी पार्टी मुळे जो आनंद मिळतो तो इतर कश्यातच नाही. नक्कीच ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहे. पण काय पुस्तकाची गरज नाही आपल्याला.? आणी पुस्तक वाचल्याने आनंद नाही मिळत आपल्याला.? (आवडते पुस्तक वाचल्याने नक्कीच आनंद मिळतो आपल्याला, परंतु आधी माहीत तर असायला हवं आपल्याला कोणते पुस्तक वाचायला आवडेल ते.?) कदाचित पुस्तक वाचण्याचे फायदे आणी परिणाम तात्काळ नाही मिळणार आपल्याला परंतु काही कालावधीनंतर वाचनाचे नक्कीच फायदे होतात. पुस्तकाचे महत्व खालील गोष्टीने नक्कीच अधोरेखित होईल.

एक 20-21 वर्षाचा तरुण मुलगा असतो. परीक्षेत आणी प्रेमात दोन्ही गोष्टीत अपयश आलेलं.