02 March, 2014

एकाकी अंत

विचारांच्या या जगात
मला कुणीतरी आठवलय 
जिने प्रेमाच्या या खेळत 
मला नरकात पाठवलंय

चांदण्या रात्रीच्या गारव्यात 
चेहरा तिचा दिसला 
त्याच क्षणी मनामध्ये 
प्रेमाचा पहिला अंकुर फुटला 

धडधडणारं हृदय मग 
बाहेर येईल कि काय असं वाटलं 
तिच्याच आठवणीने माझं
संपूर्ण हृदय दाटलं
मग तिच्यासाठीच जगावं कि मरावं
असा वाटलं

तिचं ते अलगद हसणं
आणि गालावरची खळी
तिचा चेहरा बघतच 
दुखः माझे सैरावैरा पळी

काश, स्वीकारलं असत
तिनी माझ्या प्रेमाला 
तर कदाचीत तिच्यासाठी 
जुंपलो असतो मी घाण्याला 

हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर 
आयुष्य कमी कमी होत चाललंय
आता तिच्या जुन्या आठवणींच्या 
सावल्यांनी दाटलय 

हृदय भरून आलंय
भावना हि लागल्या वहायला
ती थांबली पण नाही 
माझी हि अवस्था पाहायला 

चिंब भिजलेल्या डोळ्यातुनी 
अलगद वाट काढतील अश्रू 
ह्या अश्रूंची किमत ठरवत
केवढ्याला हे विसरू 

सूर्य निघाला मावळतीकडे 
आणि फुलेही लागली गळायला 
श्वास हि आता 
फुफ्फुस सोडून लागलाय पाळायला 

दिव्याची ज्योत देखील 
लागलीय आता फडफडायला 
संपलं त्यातील तेल आता 
उरली फक्त वात जाळायला 

जाळून जाईल वात आणी
सर्वत्र अंधार होईल 
कुणावर तरी प्रेम करण्याचा 
हा एकाकी अंत होईल.

No comments:

Post a Comment