हे Android कश्याशी खातात...? अस काही महिन्यांपूर्वी लोक (मुख्यतः वडिलधारे) विचारीत पण आज पुष्कळांना(जवळपास सगळ्यांना ) ह्या Android नावाच्या रहस्यतेच उत्तर सापडलेलं दिसतंय किंबहुना त्याची रोजच्या जीवनात सांगड पण घालण्यात येत आहे अस दिसून येत आहे.
तर हि Android नावाची मोबाईल OS (ऑपरेटिंग सिस्टीम ) सद्या सुसाट वेगान निघालीय आणी जगभरातील मोबाईल प्रेमींच्या जीवनात अधिराज्य गाजवत आहे. काय झालंय या Android मुळे अस विचारण्यापेक्षा काय नाही झालं ते विचारा. मोबाईल च्या आतील लूक पासून तर गेम, apps (अप्लिकेशन ), त्याचा युजर इंटरफेस, इंटरनेट ची सुविधा, ब्राउजर, रेल्वे तिकीट बुकिंग, कॅश ट्रान्स्फर, GPS लोकेशन पर्यंत सर्व गोष्टी ह्या Android मुळे खूप सोपी होऊन गेल्या आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांना व तरुणांनाच नाही तर मोठ्यांना आणी अक्षरशः आजोबांना देखील ह्या Android वरील गेम्स ने भुरळ घातली आहे. अंग्री बर्ड, टेम्पल रन, सबवे सर्फर, क्यांडी क्रश इ. गेम त्यात आघाडीवर आहे. त्याच प्रमाणे दुसरीकडे च्याटिंग apps ची पण भलतीच क्रेझ आहे. WatsApp ने तर च्याटिंग ची सगळी बंधनेच मोडून टाकली आहे. म्हणूनच तर अलीकडे फेसबुकने तब्बल 19,100 कोटी अशी घसघशीत रक्कम मोजून WatsApp आपल्या पारड्यात पाडून घेतली आहे. Line, WeChat या सारखे apps तर मोफत विडीओ कॉलिंग ची सुविधा देत आहे. Android आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी. सी.साठीही लोकप्रिय होत आहे.
कामातून थोडा वेळ मिळाला कि हात अपोआप मोबाईल कडे वळतात. कॉलेजमध्ये, काट्यावर, रोडवर, बस स्थानकावर, टपरीवर लोक मोबाईल मध्ये नाक खुपसून दिसतात, सतत त्यावर काही न काही करीत असतात. त्यात 80 % तरी Android वाले भेटतील. Android apps वापरकर्त्यांना मोबाईल वर खिळवून ठेवण्यात भलत्याच यशस्वी होतांना दिसत आहे. एव्हाना आपल्या मुला-मुलींना सतत मोबाईलला चिकटून बसलेले पाहून ओरडणार्या पालकांना सुद्धा कळून चुकलं असेल Android मोबाईल असला कि असंच होणार ते.
Android Inc ची स्थापना Andy Rubin, Nick Sears, Chris White आणी Rich Miner या 4 सोफ्टवेअर क्षेत्रामधील विविध कंपन्यामध्ये काम करणाऱ्या युवकांनी 2003 मध्ये एकत्र येऊनकेली. त्यांचा उद्देश मोबाईल मधील सिम्बियन (Symbian) आणी Microsoft ची विंडोज ह्या OS समांतर अशी OS विकसित करणे हा होता . नंतर 2005 मध्ये गुगलने ती Android Inc विकत घेऊन मोबाईल च्या दुनियात आपल्या Android OS ने पाउल टाकले. हि खुला स्त्रोत (Open Source) असलेली OS आहे. म्हणजे यात कुणीही आपले एखादे apps वा गेम तयार करून ते गुगल च्या प्ले स्टोर वर टाकून इतरांना वापरायला उपलब्ध करून देऊ शकतो. Android फोन्स साठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त apps उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.
काही वर्षपूर्वी नोकियाच्या सिम्बियन (Symbian) या OS (ऑपरेटिंग सिस्टीम ) ने असच मोबाईल वीरांना वेड लावलं होत. तेव्हा नोकियाच्या N- Series वाल्या मोबाईलची चलती होती. तेव्हा Samsung मध्ये BADA नावाची OS येत होती. (Samsung च्या काही फोन मध्ये आता पण येते) पण तेव्हा तिची काही तेवढी छाप पडली नाही.
सद्या Android ला Apple च्या iOS (iPhone) आणी Microsoft च्या विंडोज या OS सोबत सामना करावा लागत आहे. पण Microsoft ची विंडोज चे वापरकर्ते Android च्या तुलनेत बरेच कमी आहे आणी Apple ची iOS हि पैसेवाल्यांच्याच खिशाला परवडणारी आहे. जरी तिचे वापरकर्ते Andoid च्या तुलनेत जास्त असले तरी भारतात हे प्रमाण अगदी उलटे आहे. म्हणजे भारतात iOS पेक्षा Android वापरकर्ते जास्त आहे त्यामुळे Android ला सद्यातरी पर्याय नाही आहे. आता तर विंडोज वापरणारी नोकियाने सुध्या आपला Android फोन बाजारात आणला आहे. एकंदरीत मोबाईल च जग हे Android भोवती फिरत आहे आणी त्याला सद्या तरी पर्याय नाही आहे. म्हणून हे Android कश्याशी खातात हे सर्वाना कळलंच असेल.
No comments:
Post a Comment