05 February, 2016

कवी कट्टा- पहिला अनुभव

 65 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या निमित्याने चंद्रपुरकरांना तीन दिवस साहित्याची खमंग मेजवानी मिळाली. पहिला दिवस ग्रंथदिंडी, संमेलनाचे अध्यक्ष 'बारोमास'कार मा. सदानंद देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण आणी सायंकाळी कवी संमेलन ई. सोपस्कारासाहित पार पडला. दुसऱ्या दिवशीचे सत्र सुरु असताना दुपारी एक वाजता संमेलनाच्या एका बाजूला नवोदित कवींसाठी 'कवी कट्टे'चे आयोजन केले होते. कार्यक्रम पत्रिका न बघितल्यामुळे या बद्दल मला काहीही माहिती नव्हती. सहज जाऊन बसलो तिथे. आपणही एखादी कविता सादर करावी असा विचार आला पण या आधी मी कधीही कोणासमोर अश्या प्रकारे कविता सदर केलेली नव्हती त्यामुळे तिथे कविता सदर करायचा प्रश्नच नव्हता.

खरंतर दिड- दोन वर्ष झाली असतील मी थोड्या गांभीर्याने लिहायला सुरुवात केली तेव्हा. ते हि ह्या ब्लॉग मुळे. दर्जेदार लिखाणाकरिता अजुन भरपूर पल्ला गाठायचा आहे. पूर्वी एखादी कविता, चारोळी करायचो कॉलेजच्या दिवसात ते पण अभ्यासाला कंटाळा आला कि. त्यामुळे कधीही कुणापुढे कविता सदर केली नव्हती.

तिथे एक जन भेटला. तो ही माझ्यासारखाच. नवकवी. त्याचीही हि पहिलीच वेळ. म्हटल आपण पण कविता सादर करून पाहावी. 'जो होगा देखा जायेगा'. आपलं नाव कवीकट्टेत देण्याकरिता संपूर्ण हिम्मत एकवटली आणी आठवलं कि आपल्याकडे तर सद्या कविता पण नाही एखादी सादरकरण्याकरिता. पण माझ्याकडे माझ्या चारोळ्यांचा 'गुलमोहराच्या कुशीत' तसेच 'चारोळीगाथा' नावाचं ई- बुक होत मोबाईलमध्ये जे मी आताचा काही दिवसांपूर्वी या ब्लॉगवर प्रकाशित केलं होतं.  मग त्यातल्या काही चारोळ्या निवडल्या आणी एका कागदावर लिहिल्या सादरीकरनासाठी.

हि पहिलीच वेळ असल्याने छातीत चांगलच धडधडत होतं. इतरांच्या कविता तर मी ऐकत होतो पण त्या मला काहीच कळत नव्हत्या कारण माझं त्याकडे लक्षच नव्हतं. मी आपल्याच विचारात आणी चिंतेत होतो थोडासा गंभीर होऊन. केव्हा एकदाचा माझा नंबर येतो आणी चारोळ्या म्हणुन मोकळा होतो असं झालं होतं. आणी एकदाचा नंबर आला.


मी स्टेजवर गेलो. समोर नजर फिरविली. रसिक मंडळी बसली होती. त्यातील पुष्कळसे तर कवीकट्टेतील सहभागीच होते. लांब श्वास घेतला. नाव सांगितले आणी लागलो चारोळ्या सांगायला. चारोळ्यावर काही लोकांकडून दाद मिळत होती. त्याने थोडं रिल्याक्स व्हायला मदत झाली. चारोळ्या सादर करून खाली आल्यावर खुप बर वाटलं. नंतर संपूर्ण दिवसभर एक प्रकारचं समाधान जाणवत होतं.

नंतरच्या दिवशी म्हणजेच संमेलनाच्या शेवटच्या दिवशी देखील कवी कट्टा होणार होता. त्यामुळे रात्री कविता सादरीकरनाची तयारी केली. त्यासाठी मी 'स्त्री' हि कविता निवडली होती. कालच्या प्रमाणेच आजही नाव नोंदणी केली. कवी कट्टेचा वेळ एक वाजताचा होता परंतु डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत संपायला उशीर झाल्याने कवीकट्टा सुरु व्ह्यायला चार वाजून गेले. मी आपला कालच्या प्रमाणे तयार झालो. आज माझ्याकडे कविता पण होती. कालच्यापेक्षा थोडी कमी भीती वाटत होती. अस्वस्थताही थोडी कमी होती. कालच्या पेक्षा आज जास्त गर्दी जमली होती. 

सहा वाजुन गेले होते. काही कवींच्या कविता झाल्या. तेव्हाच कवीकाट्याच्या संयोजकाने कळविले कि आता साहित्य संमेलनाचा समारोप असल्याने आणी प्रमुख पाहुणेही आल्याने आपल्याला कवीकट्टा इथेच स्थगित करावा लागणार आहे. त्यामुळे माझा नंबर काही आलाच नाही. थोडी निराशा झाली कारण आज मी पूर्ण तयारी करून आलो होतो पण ठीक आहे, काल संधीच सोन करून जो कविता सदर करण्याचा पहिला अनुभव मी घेतला त्याचा आनंद आणी सामाधान ह्या निराशेपेक्षा कितीत्तारी जास्त आहे.

No comments:

Post a Comment