26 February, 2016

चारोळी 37, 38, 39 आणी 40



चारोळी- 37

अपयश कुणाला चुकत नाही 
म्हणुन कुणी प्रयत्न सोडत नाही.

मळलेल्या वाटेने चालून कुणी 
नव्या ठिकाणी पोहोचत नाही.

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर 
अपयशाच्या पायऱ्या चढावं लागतं.

अपयशाला घाबरून गेलं तर 
अपयशीच मरावं लागतं.

--------------------------------
चारोळी- 38

संक्रांतीच्या बाजारात 
सौंदर्याचे वाण,

सुनेच सजने जणु 
सासुचा मान.

-------------------------------

चारोळी- 39

संध्याकाळचा वारा 
तुझा सुगंध घेऊन येतो.

कोमेजलेल्या मनाला 
पुन्हा फुलवून जातो.

-------------------------------

चारोळी- 40

तु रडत असताना 
तुला बघावसं वाटतं.

तुझ्या मोत्यासारख्या अश्रूंना 
ओंजळीत जपावसं वाटतं.

----------------------------------

    © अनिकेत भांदककर. 

No comments:

Post a Comment