15 September, 2013

कहर झाला ह्यांच्या बेशार्मिचा

त्या दिवशी एका वृत्तपत्रातील “संभ्रमित अवस्थेतून विदर्भाची वाटचाल” हा लेख वाचला आणी तळपायाची आग मस्तकात गेली.

 आधीच चंद्रपूर हा महाराष्ट्रातील पहिल्या व भारतातील चवथ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा असताना अजून कशाला हे वीज प्रकल्प? आधीच गस चेंबर झालाय विदर्भाचा आणी ते कमी कि काय म्हणून केंद्र सरकारने आणखी 132 औष्णिक विद्युत प्रकल्पांना विदर्भात उभारायची मंजुरी दिली आहे (आणी त्याला पूर्ण पाठपुरावा महाराष्ट्र सरकारने केलाय हे वेगळं सांगायला नको). त्यातले 32 तर एकट्या चंद्रपुरात आहे. साध्या 12 वी पास झालेल्या मुलाला सुद्धा कळेल कि हे अति होत आहे म्हणून. मान्य कि इथे कोळसा आहे म्हणून काय इथल्या नागरिकांचे जीव घ्याल?
इथल्या शेतकऱ्यांना उपयुक्त असणार्या आणी वर्षानुवर्षे रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला पैसा द्यायला सरकारची मुठ ढिली होत नाही. इथले नागरिक जगो कि मरो पण ह्यांना मात्र ह्यांचे चोचले पुरवायला विजेचा लखलखाट पाहिजे. एवढीच खाज आहे पुण्या- मुंबईला आणी महाराष्ट्राबाहेर वीज पुरवायची तर आपल्या घराजवळ (मतदारसंघात किंवा जिल्ह्यात) उभारावे ना वीज निर्मिती केंद्र. कोळश्याच काय, कोळसा तिथे पण आणता येईलच कि.

एवढ होऊनही ह्यांची बेशार्मी बघा, सर्वात जास्त लोड- शेडींग कुठे होत असेल तर ती विदर्भातच. सगळी वीज हेच खाणार, ह्यांना तर ह्यांची धुवायला पण AC हवा ना. लाज पण नाही वाटत ह्यांना तरी तोंड उचलून येतात वर्षातून एकदा विदर्भात हे भासवायला कि आम्हीच आहो अधुनीक आणी पुरोगामी महाराष्ट्राचे कर्ता- धर्ता.

No comments:

Post a Comment