गारठलेली ती रात्र
आणि त्या रात्रीचा एकांतवास,
आणि त्या रात्रीचा एकांतवास,
वाऱ्याची एक झुळूक
हळूच आली आणि तिची
आठवण तीव्र करून गेली.
हळूच आली आणि तिची
आठवण तीव्र करून गेली.
मनामध्ये असंख्य विचारांचे
वादळ उठवून गेली.
वादळ उठवून गेली.
का मला इतकी आठवते ती....?
सतत माझ्या मनामध्ये
येऊन छळते मला.
येऊन छळते मला.
आता ह्या छळण्याने
जखम पण होऊ लागलीय
आणि या जखमेवर उपाय काय....?
जखम पण होऊ लागलीय
आणि या जखमेवर उपाय काय....?
उपाय म्हणून काढून टाकलय
तिला डोक्यातून
पण, हृदयातून कसं काढणार ...?
तिला डोक्यातून
पण, हृदयातून कसं काढणार ...?
आणि जर हृदयच
काढून टाकायचं म्हटलं तर...?
काढून टाकायचं म्हटलं तर...?
कदाचित हृदय टाकेलही काढून
पण मग त्या हृदयाला
जपणार कोण....?
पण मग त्या हृदयाला
जपणार कोण....?
आणि त्या हृदयातली ती...?
तिची काळजी कोण घेणार...?
ह्या हृदयाला तिने
स्वतःत सामावून घ्यावं,
स्वतःत सामावून घ्यावं,
निदान स्वतःला जपण्यासाठी तरी.
- अनिकेत भांदककर.
No comments:
Post a Comment