वर्षा तुझे
नाव
आकाश तुझे
गाव
तुझ्या आगमनासाठी
आतुर सारा
गाव
तुझ्या आगमनापूर्वी
आभाळ भरून
येतात
गड गड आवाज
करीत
सरी वाहू लागतात
मोत्यासारखा
थेंब
जमिनीवर पडतो
काळ्या मातीत
मग
सुगंध दरवळतो
बघता बघता
पाऊस
जोर धरू लागतो
पिसारा फुलवून
मग
मोर नाचू लागतो
सरी तुझ्या
संपताच
आभाळ खुलून
येतो
सोनेरी किरण
पडताच
इंद्रधनुष्य
दिसू लागतो
पुन्हा आभाळ
भरताच
इंद्रधनुष्य
नाहीसा होतो
तुझ्या आगमनासाठी
सारा गाव
पुन्हा आतुर
होतो.
-अनिकेत भांदककर
No comments:
Post a Comment