निशुभ्र आकाशात सहज
एक तारा तुटला असा
एक तारा तुटला असा
काळोख्या
अंधारात
काजवा
चमकतो जसा
डोळे बंद मिटुनी
मी
मागितली इच्छा अशी
सावली
सारखी ती
सोबत
असावी जशी
ओठावर तिच्या
हास्य
असू दे असे
नुकतेच
फुललेले गुलाबाचे
फुल
दिसतात जसे
तिच्या सर्व इच्छा
पूर्ण
होऊदे अश्या
पाण्यात
मारल्यावर दगड
उठतात
तरंग जश्या
तुझ्या प्रत्येक तुटण्यात
तिला
आठव
तिचे
सारे दुखः
माझ्याकडे
पाठव
झालीच चूक तिच्या
हातांनी
तर
तिला माफ कर
तिच्या
पापाची झोळी
माझ्या
पुज्ञातून साफ कर
अखंड वाहू दे
तिच्या
प्रेमाचा झरा
हाच
आमच्या मैत्रीचा धागा खरा
मैत्रीचा हा धागा
असाच
पक्का राहू दे
तिच्या
साठी पुन्हा एकदा
असाच
तर तुटू दे.
No comments:
Post a Comment