चारोळी 51.
तुझ्या केसातील गजऱ्याचा, सुटलाय सुगंध.
माळरानावर पसरलाय, तो चंद्र मंद- मंद.
असशील वेडी माझी, तर कर थोडा नाद.
हातातील काम सोडुन, दे जराशी दाद.
चारोळी 52.
विपणनाच्या दुनियेत
जो करतो कल्ला.
तोच भरू शकतो
आपला गल्ला.
चारोळी 53.
काल चंद्र खाली आला
तिचं सौंदर्य बघायला
आणी पंधरा दिवस निघालाच नाही
तिच्याएवढं सुंदर व्हयला.
चारोळी 54.
तुझी सवय झालीय मला
ती आता मोडता येणार नाही
इथवर धरून आणलेला हाथ
आता सोडता येणार नाही.
चारोळी 55.
मी स्वतःला अजुनही
पूर्ण ओळखत नाही.
कारण माझ्यातला मी कधीच
मनासारखा वागत नाही.
चारोळ्या, कविता वाचण्यासाठी शब्दझेपचे फेसबुक पेज लाईक करा.-- शब्दझेप
No comments:
Post a Comment