06 January, 2019

चारोळी- 46 ते 50

चारोळी- 46

तिच्या येण्याची चाहूल 
तिच्या पैजन्यांनी भासते.
मी वळून बघतो तेव्हा
ती लाजाळू सारखी लाजते.

===================

चारोळी- 47

दिसली तिची झलक 
ओल्या चिंब रात्री 
हिच हृदयाची राणी 
म्हणून पटली खात्री.
==================

चारोळी- 48

गोड तुझ्या हसण्याने 
पडते गालावर खळी.
फुलांच्या बागेत जणु 
प्राजक्ताची कळी. 

=================

चारोळी- 49

वाट तु निवडावी 
साथ मी द्यावी.
कुठेच न जाताही 
जर्नी पूर्ण व्हावी.

=================

चारोळी- 50

यशाच्या शिखरावरून कसं 
सारं गाव छोटं दिसतं.
आणी त्या गावातून ते शिखर 
किती मोठं दिसतं.

=================

- अनिकेत भांदककर.

No comments:

Post a Comment