23 May, 2016

चारोळ्या- 41 ते 45

चारोळी- 41

मी सहज लिहावी कविता 
प्रेमाची उपमा तू द्यावी,
शब्दाला प्राप्त व्हावा अर्थ 
जेव्हा चाल तू गुंफावी.

चारोळी- 42

लोक काय म्हणतील 
म्हणुन भिऊ नकोस जनाला.
मी आवडतो का तुला 
विचार आपल्या मनाला.

चारोळी- 43

नऊवारी साडी 
केसात गजरा.
लाखोंच्या गर्दीत 
तुझ्यावर नजरा.

चारोळी- 44

भरजरी तुझे लाजणे
घाव करी हृदयावर,
टाकुनी कटाक्ष इवलासा
मन सैर-वैर वाऱ्यावर.

चारोळी- 45

सौंदर्य तूझे अधिक
खुलवी हे कुरळे केस.
त्यात मळुनी गजरा
काठपदराची साडी नेस.

© अनिकेत भांदककर 
फेसबुक पेज- https://www.facebook.com/Shabdjhep/

No comments:

Post a Comment