25 December, 2015

चारोळी- 29, 30, 31 आणी 32










चारोळी- 29

सांगता येत नाही म्हणून रडायचं नसतं
व्यक्त करता येत नाही म्हणून हरायचं ही नसतं.
भावना या अश्याच असतात 
त्यांना फक्त हृदयाच्या कोपऱ्यात जपायचं असतं.

===================================
चारोळी- 30

वाट बघत बसलोय तुझी 
आयुष्य तुला अर्पण हे.
सांजवेड्या या वेड्याला 
आता तरी दर्शन दे.

===================================
चारोळी- 31

पावसाच्या संसतदार धारा
तुझ्या चेहर्यावरून सहज ओघळल्या.
मी आपला पाहतच राहिलो
त्या तुझ्या चरणी येऊन विसावल्या.

===================================
चारोळी- 32

रंग माझा सावळा 
प्रेमाने कर रंगीत 
बहरूनी जाईल जिवन 
तुझ्या संगतीत.

==================================

© अनिकेत भांदककर.