12 February, 2015

एका रात्रीतून मत बदलतात इथे...

दिल्ली निवडणुकीचा निकाल लागला आणी चांगल्या चांगल्यांचे भाकीत खोटे ठरले. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जे राहुल गांधीचे केले तेच दिल्ली निवडणुकीत केजारीवालांनी मोदी यांचे केले. आणी ते म्हणजे वस्त्रहरण. खरतर दिल्ली निवडणुकीत आप पक्षाला एवढ्या जागा मिळतील असे खुद केजारीवालांना देखील वाटले नसेल. पण म्हणतात ना कि 'देनेवाला जाब भी देता है छप्पर फाड के देता है'. 

दिल्ली निवडणुकीचा लागलेला अनपेक्षित निकाल आणी त्यानंतर जनसामाण्यातून मिळणारा प्रतिसाद, ह्यावरून एकच गोष्ट लक्षात येते कि 'उगवत्या सूर्याला सारेच नमस्कार करतात'. कालपर्यंत मोदी हे उगवते सूर्य होते. आज केजरीवाल आहेत. जो तो 'आप'च्या विजयाने हरळून गेला आहे. केजरीवालसंबंधी whatsaap, फेसबुक वर फिरनाऱ्या संदेशांनी एकदम विरोधी रूप धारण केले आहे. कालपर्यंत टीका आणी खिल्ली उडविणारे हे संदेश आता गुणगान गाऊ लागले आहे. जो तो आता केजारीवालांच गुणगान गाऊ लागला आहे. 

आता तुम्ही म्हणाल त्यात काय वाईट.? केजारीवालांनी एवढे दिवे लावलेच आहे तर त्यांचे गुणगान गाण्यात हरकत काय आहे.? बरोबरच आहे हे. पण कालपर्यंत केजारीवालांचे दुर्गुण गाणारे आज एकदम सद्गुण गाऊ लागले आहे. खरतर केजरीवाल तेच आहे फरक आहे तो आपल्या विचारसरणीत. 


लोकसभा निवडणुकीपर्यंत कॉंग्रेस आणी गांधी घराण्याचे गुणगान गाणारे लोक आणी माध्यमे लोकसभा निवडणुकीनंतर  एकदम मोदींचे गुणगान गाऊ लागले. भाजपावर हिंदुत्ववाद्यांची टीका करणारे हे महाभाग लोकसभा विजयानंतर मोदीला विकासपुरुष मानू लागले. तसच कालपर्यंत केजारीवालांना पळपुटा म्हणणारे आता त्यांच्या ऐतिहासिक विजयाला 'सच्चाई कि जीत' म्हणू लागले. राजकारणी तर संधी साधू अस्ततातच पण आपण देखील काही वेगळे नाहीत हेच आपण ह्यावरून सिद्ध करीत आहोत.

तसही भारतीय लोक एखाद्याच्या व्यक्तीप्रतिमेला त्याच्या कामापेक्षा जास्त महत्व देतात. एखादं चांगलं काम केलं कि खूप डोक्यावर घेतात आणी सरळ देवच बनवून टाकतात आणी जरा जरी त्या व्यक्तीच चुकलं वा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध केली कि मग हेच लोक त्याला दानव बनवितात, त्याचं चीरहरन करतात. म्हणजे एकदम 'आर या पार'.

माणुस एका रात्रीतून कधीच बदलत नसतो. बदलते ती त्याच्या भोवतालची परिस्थिती. त्यामुळे एखादा कर्तुत्ववान व्यक्तीदेखील क्षणात कर्तुत्व शून्य वाटू लागतो. तेव्हा एखाद्याबद्दल आपण कपडे बदलविण्यासारखे आपले मत न बदलविणे केव्हाही चांगलं.

आता केजारीवालाची मोदींशी तुलना होऊ लागली आहे. म्हणजे मोदी आले आणी त्यांनी जसं कॉंग्रसला साफ केलं तसच केजरीवाल आले आणी त्यांनी मोदीला (निदान दिल्लीतून तरी) साफ केलं. मग इथे एक लक्षात घ्यायला पाहजे कि जर असं असेल तर 9 महिन्यानंतर देखील भाजप ज्या प्रमाणात कुचकामी ठरली आहे त्याच अधारानुसार 'आप' देखील पुढील 9-10 महिन्यात कुचकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, आठवतं मागील दिल्ली निवडणुकीत केजारीवालांनी ज्या घोषणा केल्या होत्या प्रत्येक्षात सत्ता आपल्यावर त्याच्या अगदी विरुद्ध कृती केली होती. म्हणजे सत्ता आल्यावर आम्ही बंगला, गाडी घेणार नाही वगैरे आणी नंतर याचा मोह काही सुटला नव्हता. 

त्यामुळे यापुढे केजरीवाल हे पोकळ घोषणाबाजच ठरतात कि जे म्हटलं ते करून दाखवतात हेच बघायचं आहे. त्यामुळे असे मोदी, केजरीवाल ई. बद्दल एकारात्रीतून मत बदलण्यापेक्षा त्यांना दिलेली पाच वर्ष ते कशी मार्गी लावतात ते बघुया. आणी मगच कोण हिरो आणी कोण झिरो ठरवून त्याबद्दल आपली मत मांडू या.

No comments:

Post a Comment