18 September, 2014

गुगल चा नवीन फोन 'Android One' भारतीय बाजारात

ह्या जगात एकच गोष्ट कायम असते आणी ती गोष्ट म्हणजे 'बदल'. काळानुसार बदल हा होतंच असतो आणी मनुष्याला देखील काळानुसार बदलावे लागते. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान देखील काळानुसार बदलत असते. जो बदलतो तोच टिकतो आणी जो थांबतो तो संपतो. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे 'नोकिया'. एकेकाळची, संपूर्ण जगावर आपल्या मोबाईलने अधिराज्य गाजवणारी कंपनी काळानुसार बदलली नाही आणी  त्यामुळे जगाच्या मागे पडून, काही वर्ष घाट्यात चालून परिमाणी शेवटी ती कंपनी माईक्रोसॉफ्टला विकावी लागली. 

संपूर्ण जग Android वर वेड होत असताना नोकिया आपल्या सिम्बियन या पारंपारिक ओप्रेटिंग सिस्टीमलाच चिकटून होती व त्याचे परिणाम तिला भूगतावे लागले. Apple ने आपली धडाकेबाज 'आय- फोन' सिरीज बाजारात आणली तर स्यामसंगने 'ग्यालेक्सी सिरीज' आणली. त्यासमोर नोकियाचे ते जुनाट 'एन सिरीज'चे फोन फिके पडले. असो.

आजच्या लेखाचा विषय हा नोकियाच्या अपयशावर टिपणी करणे नसून नुकताच बाजारात आलेल्या 'गुगलच्या अन्द्रोइड वन' या फोनची माहिती देणे हा आहे.  


गुगल हि इंटरनेट जगतातली दादा कंपनी. सर्च इंजिन, यु टूब, गुगल प्लस, पिकासा, ब्लॉगर, जी मेल ई. लोकप्रिय वेबसाईटमुळे गुगल पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच मोबाईल क्षेत्रात गुगल मागेच आपल्या नेक्सस या हांडसेटसह बाजारात उतरली होती. परंतु या वेळेस गुगल ने 'गुगल वन' नावाने आपले वेगवेगळ्या कंपनीसोबत टाय-अप करून तीन हंड्सेट बाजारात उतरवले आहे. 

गुगलने कार्बन, मायक्रोम्याक्स आणी स्पाईस सोबत टाय-अप करून खालील तीन हंड्सेत 'गुगल वन' या नावाने भारतीय बाजारात उतरविले आहे.

1- स्पाईस ड्रीम UNO (Spice Dream UNO) - INR6,299 ($103)

२- कार्बन स्पार्क V (Karbonn Sparkle V) - INR6,399 ($105) 

3- मायक्रोम्याक्स कॅनवास A1 (Micromax Canvas A1) - INR6,499 ($106)


या तीनीही हंड्सेटमध्ये -----------

- स्क्रीन  4.5” FWVGA (854x480) म्हणजेच साडेचार इंचाची,
- 1 GB Ram, 
- 4GB storage (32GB पर्यंत वाढविता येते), 
- 1.3GHz quad-core Cortex-A7 प्रोसेसर, 
- 5 megapixel मागील camera, 2 megapixel पुढील camera
- dual SIM support, 
- 1,700mAh battery ई. गोष्टी देण्यात आल्या आहे.
- हे तीनीही हंड्सेट  Android, 4.4.4 KitKat या ओप्रेटिंग सिस्टीमवर चालतात.

या तीनही हंड्सेटचे फीचर्स सारखेच आहे फक्त थोडा फरक आहे तो त्यांच्या डीजाईन मध्ये. आणी त्यांच्या किमती देखील 100 रुपयाच्या फरकाने म्हणजे जवळपास सारख्याच आहे. सद्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही 6500 रुपयापर्यंतच्या फोन च्या तुलनेत हे फोन नक्कीच स्वस्त आणी जास्त फीचर्स देणारे आहे. शिवाय मायक्रोम्याक्सने देखील भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. तर गुगल च्या स्वस्तात मस्त फोनची रिस्क घ्यायला काहीच हरकत नसावी.

No comments:

Post a Comment