21 July, 2014

सुखावणारा पाऊस

या वर्षी पाऊस कमी पडणार असं हवामान खात्याने सुरुवातीलाच सांगितलेलं. उन्हाळाही चांगलाच कडक होता. जुलै महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाचा राज्यात पत्ता नाही (मुंबईत मधात जो काही बरसला तेवढाच). खरतर उन्हाळ्याच्या गर्मीने असह्य झालेल्या सर्व सजीवांना पावसाने नवसंजीवनी मिळते. ओसाड आणी कुरूप झालेलं जंगल पावसाने कसं हिरवागार आणी सुंदर दिसतं. जगाचा पोशिंदाही पावसाने खुश होतो. वातावरणात गारवा येतो. प्रेमयुगुलांसाठी तर ही पर्वणीच असते. जणू काही त्यांच्या साक्षीने पाऊसच प्रेमाची उधळण करीत असतो. असा हा पाऊस.

पाऊस नाही बरसला तर जशी ओरड होते तशीच तो जास्त बरसला तरी देखील ओरड होते, नुकसान होते. परंतु अर्धाअधिक जुलै निघून गेला तरी पावसाचा काही पत्ता नाही त्यामुळे त्याच्या नावाने खडे फोडणे सुरु झाले होते. मागच्या वर्षी पावसाने कहरच केला होता. यंदा पाऊस कमी पडून कहर करतो कि काय असं वाटायला लागलं होत. पण शनिवारच्या रात्रीने ती भीती दूर केली. निदान पूर्व विदर्भवाल्यांची तरी. 

शनिवार रात्रीपासून जे त्याने बरसायला सुरुवात केली ते हा लेख लिहितपर्यंत (सोमवार सायंकाळपर्यंत) तरी बरसणे थांबविले नव्हते. पाऊस जोराचा नसला तरी रिमझिम - रिमझिम दिवसभर सुरु होता. त्यामुळे सारा परिसर हिरवी चादर ओढल्यासारखा भासत होता. नद्या पण चांगल्याच दुथड्या भरून वाहु लागल्या आहे. छत्र्या- रेनकोट घालून लोक बाहेर पडायला लागली आहे. जोगोजागी पकोडे व बुट्टI चे ठेले ग्राहकाने वेढलेले दिसायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर आणी कडेला पाण्याची डबकी साचू लागली आहे.

हा पाऊस नक्कीच सुखावणारा आहे. पण तो पर्यंतच जो पर्यंत तो एका मर्यादेपर्यंत बरसेल. त्यानंतर तो दुखावणारा असेल.

No comments:

Post a Comment